​डिअर जिंदगीमध्ये नव्या रूपात असेल ‘ये जिंदगी गले लगा ले’

#Dear Jindagi new song released : #Ye Jindgi gale laga le ; शाहरुख खान व आलिया भट्ट यांची प्रमुख भूमिका असलेल्या डिअर जिंदगी मध्ये कमल हसन व श्रीदेवी यांच्या सदमा या चित्रपटातील ‘ये जिंदगी गले लगा ले’ हे गाणे अरिजित सिंगने नव्या रुपात गायले आहे.

​डिअर जिंदगीमध्ये नव्या रूपात असेल ‘ये जिंदगी गले लगा ले’
Published: 24 Nov 2016 02:50 AM  Updated: 29 Nov 2016 11:53 AM

बॉलिवूडचा किंग शाहरुख खान व बॉलिवूडची बबली गर्ल आलिया भट्ट यांचा आगामी ‘डिअर जिंदगी’या चित्रपटाची चांगलीच चर्चा सुरू आहे. ‘डिअर जिंदगी’मध्ये कलम हसन व श्रीदेवीच्या गाजलेल्या ‘सदमा’ या चित्रपटातील ‘ये जिंदगी गले लगा ले’ हे गाणे नव्या अंदाजात पहायला मिळणार आहे. हे गाणे नुकतेच रिलीज करण्यात आले आहे. ‘डिअर जिंदगी’मध्ये ‘ये जिंदगी गले लगा ले’ हे गाणे अरिजित सिंगने गायले आहे. 

‘सदमा’ या चित्रपटातील ‘ये जिदंगी गले लगा ले’ हे गाणे आजही लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. ईलया राजा यांनी संगीतबद्ध केलेल्या या गाण्याला सुरेश वाडकर यांनी आपल्या आवाजाने एका वेगख्याच उंचीवर नेऊन ठेवले आहे. हेच गाणे पुन्हा नव्याने ‘डिअर जिंदगी’ चित्रपटात सादर करण्यात आले आहे. अरिजीत सिंह याने त्याच्यापरीने हे गाणे चांगले गाण्याचा प्रयत्न केला आहे. दोन्ही गायकांत तुलना करणे योग्य होणार नाही. मात्र अरिजितने आपल्या परिने हे गाणे गाताना नाविण्याचा शोध घेतला आहे. यामुळे हे गाणे अनेकांना आवडणारे ठरू शकते. 

Sadama- ye jindagi-song - dear Jindagi

गौरी शिंदे दिग्दर्शित डिअर जिंदगी हा चित्रपट स्त्रीच्या भावना विश्वाचा शोध घेणारा असल्याचे सांगण्यात येते. आलिया भट्टने यात प्रमुख भूमिक ा केली असून शाहरुख खान तिचा मार्गदर्शक म्हणून पहायला मिळेल. यासोबतच या चित्रपटात कुणाल कपूर, अली जफर व अंगद बेदी यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. लवकरच हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याने शाहरुख व आलिया याचे जोरदार प्रमोशन करीत आहेत. 

नव्या स्वरूपातील ‘ये जिंदगी’ गाणे पाहुयाच...
 


मराठी बिग बॉस हिट ठरणार का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :