20 आॅक्टोबरला येणार ‘दंगल’चे ट्रेलर

उद्या गुरुवारी म्हणजे 20 आॅक्टोबरला दंगलचे ट्रेलर लाँच करण्यात येणार आहे.

20 आॅक्टोबरला येणार ‘दंगल’चे ट्रेलर
Published: 19 Oct 2016 03:19 AM  Updated: 19 Oct 2016 03:42 PM

 अजय देवगनचा ‘शिवाय’ व करण जोहरचा ‘ऐ दिल है मुश्किल’ची उत्सुकता शिगेला पोहोचली असतानाच प्रेक्षकांना आमिर खानच्या बहुप्रतिक्षीत ‘दंगल’ या चित्रपटाचे ट्रेलर पाहायला मिळणार आहे. उद्या गुरुवारी म्हणजे 20 आॅक्टोबरला दंगलचे ट्रेलर लाँच करण्यात येणार आहे.

‘‘खून पसिना एक होगा, दो दिन मे शुरू होंगा दंगल, इस दंगलवार रहीये तयार, दंगल ट्रेलर आऊट आॅन 20 आॅक्टोबर’’ असे टिष्ट्वट करण्यात आले आहे. या टिष्ट्वटसोबतच ‘दंगल’चे पोस्टरही जारी करण्यात आलेय.  

http://




पहेलवान महावीर सिंग फोगट यांच्या जीवनावर आधारित असलेल्या‘दंगल’ या चित्रपटात आमिर खान प्रमुख भूमिका साकारतोय. या चित्रपटासाठी आमिरने बरीच मेहनत घेतली असून पिळदार शरीरष्टी असलेल्या पहेलवानापासून ते उतरावयात वजन वाढविलेल्या रूपात तो दिसणार आहे. नितेश तिवारी दिग्दर्शित ‘दंगल’ या चित्रपटमध्ये महावीर फोगटच्या भूमिकेतील आमिर आपल्या मुलींना कुस्तीचे धडे देताना दिसेल. या चित्रपटात साक्षी तन्वर, सन्या मल्होत्रा व फातीमा सना शेख यांच्या भूमिका आहेत. 

शाहरुख खानचा ‘रईस’, आमिर खानचा ‘दंगल’ व हृतिक रोशनचा ‘काबिल’ या तिन्ही चित्रपटाचे ट्रेलर दिवाळीदरम्यान आऊट होणार, असे मानले जात होते. यात कोण बाजी मारेल यावर चांगलीच चर्चा रंगली होती.  मात्र सर्व चर्चांना विराम देत आमिरने बाजी मारली आहे.  



मराठी बिग बॉस हिट ठरणार का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :