सिनेसृष्टी हळहळली ! श्रीदेवी यांना कलाकारांची ट्विटरवरून आदरांजली...

अभिनेत्री श्रीदेवी यांचे दुबईत हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. वयाच्या ५४व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बॉलिवूडमध्ये आपले वेगळे स्थान निर्माण करणारी ही अभिनेत्री काळाच्या पडद्याआड गेली आहे.

सिनेसृष्टी हळहळली ! श्रीदेवी यांना कलाकारांची ट्विटरवरून आदरांजली...
Published: 25 Feb 2018 12:47 PM  Updated: 25 Feb 2018 05:26 PM

अभिनेत्री श्रीदेवी यांचे दुबईत हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. वयाच्या ५४व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बॉलिवूडमध्ये आपले वेगळे स्थान निर्माण करणारी ही अभिनेत्री काळाच्या पडद्याआड गेली आहे.  ही बातमी कळताच हिंदी सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी श्रीदेवी यांना ट्विटरच्या माध्यमातून आदरांजली वाहिली आहे.रझा मुराद 
देवाच्या मर्जीपुढे कुणाचे काहीच चालत नाही. श्रीदेवी या स्वत:च्या तब्येतीची खूप काळजी घ्यायच्या. कुटुंबियांची देखील त्या तेवढीच काळजी घेत असत. करिअरच्या बाबतीत म्हटले तर त्यांच्या ‘हिंमतवाला’ चित्रपटानंतर त्यांनी कधीही मागे वळून पाहिले नाही. श्रीदेवी यांची लोकप्रियता अशी होती की, त्या स्वत:च्या हिमतीवर चित्रपट हिट करायच्या. त्यांच्या आत्म्याला शांती मिळो.सुभाष घई
१९८५ च्या ‘कर्मा’ चित्रपटात श्रीदेवी यांनी माझ्यासोबत काम केलं. अशी श्रीदेवी पुन्हा होणे नाही. आम्ही अजूनही या धक्क्यातच आहोत. भारतीय चित्रपटसृष्टीची खूप मोठी हानी झाली आहे. ती माझा मित्र बोनी कपूरची पत्नी होती. एक उत्तम गृहिणी, आई आणि घरी येणाºयांचे योग्य आदरातिथ्य करणारी महिला होती. तिच्या आत्म्याला शांती लाभो.रजनीकांत
मी माझी एक खूप चांगली मैत्रीण गमावली. तसेच  चित्रपटसृष्टीने एक महत्त्वाची अभिनेत्री गमावली आहे. तिच्या कुटुंबियांच्या दु:खात मी सहभागी आहे. तू कायम स्मरणात राहशील.अक्षय कुमार
बातमी ऐकून काय म्हणावे यासाठी शब्दच नाहीत. त्यांच्यासोबत काही वर्षांपूर्वी काम करण्याची संधी मिळाली हे मी माझे नशीब समजतो. त्यांच्या कुटुंबाच्या दु:खात मी सहभागी आहे. 

प्रियांका चोप्रा
दु:खदायक घटना घडली आहे. त्याबाबत बोलण्यासाठी शब्दच नाहीत. सिनेसृष्टीसाठी हा क्लेशदायक दिवस आहे.

शिल्पा शेट्टी
श्रीदेवी यांच्या निधनाची बातमी ऐकून धक्का बसला. एका सुंदर कथेचा अंत झाला. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो.

अजय देवगण
श्रीदेवी यांनी जगाचा निरोप घेतला यावर विश्वासच बसत नाही. धक्कादायक बातमी.सतीश कौशिक 
श्रीदेवी आपल्यात नाही यावर विश्वासच बसत नाही. मला जेव्हा कळालं तेव्हा मी दिल्लीत होतो. मोबाईलवर खूप सारे मेसेजेस आलेले होते. मग मी अनिलसोबत बोललो. खरंच खूप शॉकिंग आहे. नेहमी इतरांना मदत करणारी, कायम प्रत्येकाच्या सोबत असणारी ही व्यक्ती आपल्याला सोडून जाऊ शकते यावर विश्वासच बसत नाही. जोशिले, मि.इंडिया मध्ये आम्ही एकत्र काम केले. पण, सेटवर आल्यानंतरचा तिचा ग्रेस, पर्सनॅलिटी पाहून खूपच प्रभावित झाल्यासारखे वाटायचे. रविकिशन 
श्रीदेवी यांचे निधन हे सर्वांसाठीच खूप शॉकिंग आहे. मी त्यांचा खूप मोठा फॅन आहे. मी त्यांच्या कुटुंबियांच्या खूप जवळचा आहे. त्यांच्यासोबत काम करताना दडपण येत नसायचं उलट आदर वाटायचा. सेटवर आल्यावर एकदम जबाबदार, शांत मनाने त्या कामाला सुरूवात करत असायच्या. कॅमेरा आणि अ‍ॅक्शन सुरू झाले की, मग त्या अभिनेत्रीच्या भूमिकेत घुसायच्या. सीन शूट झाला की मग लगेचच त्या सर्वांशी हसून बोलायच्या. त्यांच्या अनेक आठवणी सर्वच कलाकारांकडे असतील. रविना टंडन
श्रीदेवी यांच्या जाण्याने सर्व कलाकारांची वैयक्तिक  हानी झाली आहे. तिचं जाणं सर्वांसाठीच खूप शॉकिंग होतं. सगळ्यांसाठी ती एक प्रेरणा होती. ‘लाडला’मध्ये आम्ही एकत्र काम केलं. व्यक्ती म्हणून ती खूपच चांगली होती. तिच्यासोबत काम करणं म्हणजे सर्व सहकलाकारांसाठी अगदीच गौरवाची बाब असायची.गुलशन ग्रोव्हर
बॉलिवूडची खूप मोठी हानी झाली. ती एक गुणी अभिनेत्री होती त्यासोबतच ती एक चांगली व्यक्ती होती. सर्व कलाकारांकडे तिच्याबद्दलच्या अनेक आठवणी, शिकवण आहेत. तिच्या जाण्याने खूप मोठी पोकळी निर्माण झाली आहे. माधुरी दीक्षित
श्रीदेवी गेल्याचं कळालं आणि खूप मोठा धक्का बसला. माझं हृदय आता त्यांच्या कुटुंबियांसोबत आहे. एक उत्तम अभिनेत्री आणि चांगला व्यक्ती बॉलिवूडने गमावला आहे. त्यांच्या आत्म्याला शांती मिळो.
 


माधुरी दीक्षितचा बकेट लिस्ट बॉक्स ऑफिसवर हिट ठरेल का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :