Bhoomi song OUT : ‘ट्रिप्पी ट्रिप्पी’ गाणे रिलीज; पाहा, सनी लिओनीचा ‘शकीरा स्टाईल’ डान्स !

संजय दत्तच्या ‘भूमी’ या ‘कमबॅक’ चित्रपटाची सगळ्यांनाच प्रतीक्षा आहे. ‘भूमी’चा शानदार ट्रेलर आपण बघितलाच. आता ट्रेलरनंतर चित्रपटाचे ‘ट्रिप्पी ट्रिप्पी’ हे गाणे रिलीज करण्यात आले आहे.

Bhoomi song OUT :  ‘ट्रिप्पी ट्रिप्पी’ गाणे रिलीज; पाहा, सनी लिओनीचा ‘शकीरा स्टाईल’ डान्स !
Published: 18 Aug 2017 02:17 PM  Updated: 18 Aug 2017 02:17 PM

संजय दत्तच्या ‘भूमी’ या ‘कमबॅक’ चित्रपटाची सगळ्यांनाच प्रतीक्षा आहे. ‘भूमी’चा शानदार ट्रेलर आपण बघितलाच. आता ट्रेलरनंतर चित्रपटाचे ‘ट्रिप्पी ट्रिप्पी’ हे गाणे रिलीज करण्यात आले आहे.  या गाण्याला गाणे म्हणण्याऐवजी हॉट अ‍ॅण्ड ब्युटिफुल सनीचे आयटम साँग म्हणावे लागेल. काही दिवसांपूर्वीच या गाण्याचे काही फोटो लीक झाले होते. या फोटोंमध्ये ब्लॅक ड्रेसमधील सनी प्रचंड हॉट दिसली होती. तिचे ते हॉट फोटो बघून सनीचे चाहते तिच्या या आयटम नंबरची आतुरतेने प्रतीक्षा करत होते. अखेर हे गाणे रिलीज झाले. सचिन -जिगरने कम्पोज केलेले हे गाणे गणेश आचार्यने कोरिओग्राफ केले आहे. या गाण्यातील सनी लिओनीचा हॉट अंदाज आपल्याला पाहायला मिळणार आहे. सनी बारमध्ये डान्स करताना यात दिसतेय. सनीच्या या गाण्याला नेहा कक्कड, बेनी दयाल, बिजेश शांडिल्य व बादशाहने आवाज दिलाय. प्रिया सरैया व बादशाहने गाण्याचे बोल लिहिले आहेत.



ALSO READ : Bhoomi Trailer Out :​ जबरदस्त अ‍ॅक्शनसह संजय दत्तची ‘वापसी’!

‘भूमी’ या चित्रपटात एका बाप-लेकीची कथा दिसणार आहे. संजय दत्त यात मुख्य भूमिकेत आहे. संजय आपल्या मुलीवर जीवापाड प्रेम करत असतो. पण त्याची जीवापाड जपलेली मुलगी काही नराधमांच्या अत्याचाराला बळी पडते. आपल्या मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी हा पिता संपूर्ण जगाशी लढायला निघतो आणि आपल्या मुलीवर झालेल्या अन्यायाचा सूड घेतो. संजयसोबत शेखर सुमन आणि शरद केळकर यांच्याही या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.  उमंग कुमार दिग्दर्शित हा चित्रपट येत्या २२ सप्टेंबरला रिलीज होतो आहे. या चित्रपटाकडून संजयला बºयाच अपेक्षा आहेत. अलीकडे एका मुलाखतीत संजयने या अपेक्षा बोलून दाखवल्या होत्या. अनेक वर्षांनंतर ‘भूमी’च्या सेटवर पहिल्या दिवशी काम करण्याचा अनुभव शानदार होता. हा दिवस मी कधीही विसरू शकत नाही. मी पुन्हा माझ्या कामावर परतलो होतो. हा दिवस मला भावूक करणारा होता. मी या चित्रपटाच्या रिलीजची आतूरतेने प्रतीक्षा करतोय, असे तो म्हणाला होता.


कंगना राणौतचा सिमरन हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरेल का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :