Box Office : विसाव्या दिवशीही ‘बाहुबली-२’चाच दबदबा, कमाईचे आकडे थक्क करणारे!

​‘सध्या देशभरात ‘बाहुबली-२’मय वातावरण झालेले आहे. भारतातच नव्हे तर विदेशातही या चित्रपटाची जबरदस्त जादू बघावयास मिळत आहे. ‘बाहुबली-२’ रिलीज होऊन आज तब्बल २० दिवस पूर्ण झाले आहेत; मात्र अशातही देशातील बहुतांश भागांमध्ये ‘बाहुबली-२’चे शो हाउसफुल या नावाखाली चालत आहेत.

Box Office : विसाव्या दिवशीही ‘बाहुबली-२’चाच दबदबा, कमाईचे आकडे थक्क करणारे!
Published: 17 May 2017 03:51 PM  Updated: 17 May 2017 03:54 PM

‘सध्या देशभरात ‘बाहुबली-२’मय वातावरण झालेले आहे. भारतातच नव्हे तर विदेशातही या चित्रपटाची जबरदस्त जादू बघावयास मिळत आहे. ‘बाहुबली-२’ रिलीज होऊन आज तब्बल २० दिवस पूर्ण झाले आहेत; मात्र अशातही देशातील बहुतांश भागांमध्ये ‘बाहुबली-२’चे शो हाउसफुल या नावाखाली चालत आहेत. आतापर्यंत बाहुबली या चित्रपटाने बॉक्स आॅफिसवरील संपूर्ण रेकॉर्ड ब्रेक केले आहेत. असे कुठलेच रेकॉर्ड नसेल जे ‘बाहुबली-२’ने आपल्या नावावर केले नसेल. ‘बाहुबली-२’विषयीच्या आतापर्यंतच्या प्रवासाचा हा स्पेशल रिपोर्ट...

एक हजार कोटींच्या क्लबमध्ये स्थान
‘बाहुबली-२’ हा चित्रपट लवकरच एक हजार कोटींच्या क्लबमध्ये स्थान मिळविणार आहे. भारतात सर्व भाषांच्या कलेक्शनचा विचार केल्यास या चित्रपटाने आतापर्यंत ९२५ कोटी रुपयांची कमाई केली आहे. तर वर्ल्डवाइड क्लेक्शनचा विचार केल्यास आतापर्यंत या चित्रपटाने १४५० कोटी रुपयांपेक्षा अधिक कमाई केली आहे. भारतीय चित्रपटसृष्टीत हे खूप मोठे रेकॉर्ड आहे. २० दिवस... ४५० कोटी
२८ एप्रिल रोजी रिलीज झालेल्या ‘बाहुबली-२’ला आज २० दिवस पूर्ण झाले आहेत. हिंदी वर्जनमध्ये या चित्रपटाने बॉक्स आॅफिसवर आतापर्यंत ४५० कोटी रुपयांची कमाई केली आहे. हे एक रेकॉर्ड असून, एवढ्या मोठ्या प्रमाणात कमाई करणारा ‘बाहुबली-२’ हा पहिलाच चित्रपट ठरला आहे. 

नेट प्रॉफिट किती असेल?
‘बाहुबली-२’ने आतापर्यंत ३८८ टक्के नेट कमाई केली आहे. २०१७ पर्यंत सर्वाधिक उत्पन्न देणारा हा चित्रपट ठरला आहे. यापूर्वी एकाही चित्रपटातून एवढे उत्पन्न मिळू शकले नाही. त्यामुळे हे एक रेकॉर्ड आहे. अमेरिकेतही ‘बाहुबली-२’ फिव्हर
भारतातील प्रेक्षकांप्रमाणेच अमेरिकेतील प्रेक्षकही हा चित्रपट बघण्यासाठी चित्रपटगृहात तुफान गर्दी करीत आहेत. कारण नॉर्थ अमेरिकेत या चित्रपटाने काही दिवसांमध्येच १२१.६९ कोटींची कमाई केली. हे एक रेकॉर्ड असून, एवढी झटपट कमाई करणारा ‘बाहुबली-२’ हा पहिलाच चित्रपट ठरला आहे. 

आॅस्ट्रेलियात टॉप-२
आॅस्ट्रेलियातही ‘बाहुबली-२’चा जलवा कायम आहे. कारण याठिकाणी बाहुबली सर्वाधिक कमाई करणारा दुसरा चित्रपट ठरला आहे. बाहुबलीच्या पुढे आमीर खानचा ‘दंगल’ हा चित्रपट असून, काही दिवसांमध्ये त्याला ओव्हरटेक करण्याची शक्यता समीक्षकांकडून वर्तविली जात आहे. 

सर्वच रेकॉर्ड चकनाचूर
आतापर्यंत ‘बाहुबली-२’ने बॉक्स आॅफिसवर ५० पेक्षा अधिक रेकॉर्ड बनविले आहेत. या रेकॉर्डला ब्रेक करणे खूप अवघड असून, आगामी बाहुबलीच्या तोडीस चित्रपटाची निर्मिती करावी लागेल, यात शंका नाही. बाहुबली गेम 
सध्या तरुणांमध्येच नव्हे तर बच्चे कंपनींमध्येही ‘बाहुबली’ची क्रेज स्पष्टपणे बघावयास मिळत आहे. कारण बाहुबलीवर आधारित ‘बाहुबली गेम’ आतापर्यंतचा सर्वाधिक डाउनलोड केलेला गेम ठरला आहे. आतापर्यंत १ मिलियनपेक्षा अधिक हा गेम डाउनलोड केला गेला. 

सर्वात फास्ट ३०० कोटींचा क्लब
‘बाहुबली-२’ने बॉक्स आॅफिसवर सर्वाधिक फास्ट कमाई करण्याचा कीर्तिमान रचला आहे. शंभर, दोनशे आणि तीनशे कोटी क्लबचा पल्ला बाहुबलीने केवळ दहाच दिवसांत पार केला. या अगोदर फास्ट ३०० कोटींचा क्लब गाठण्याचे रेकॉर्ड ‘दंगल’च्या नावे होते. ‘दंगल’ने हे रेकॉर्ड १३ दिवसांत केले होते. आता बाहुबलीने २० दिवसांत एक हजार कोटींचा क्लबही गाठला आहे. 


मराठी बिग बॉस हिट ठरणार का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :