OMG!! ​बॉलिवूडच्या ‘या’ चित्रपटात दिसला होता ‘बाहुबली’ प्रभास!

प्रभासच्या बॉलिवूड डेब्यूची लोकांना प्रतीक्षा आहे. पण खरे सांगायचे तर अजय देवगणच्या ‘अ‍ॅक्शन जॅक्शन’मध्ये प्रभास दिसला होता. तोही सोनाक्षी सिन्हासोबत डान्स करताना. अर्थात त्यावेळी त्याच्याकडे कुणाचे फारसे लक्ष गेले नव्हते.

OMG!! ​बॉलिवूडच्या ‘या’ चित्रपटात दिसला होता ‘बाहुबली’ प्रभास!
Published: 28 Feb 2017 05:30 PM  Updated: 28 Feb 2017 05:30 PM

‘बाहुबली: दी बिगीनिंग’ या चित्रपटाने अभिनेता प्रभास याला एक नवी ओळख दिली. या चित्रपटाआधी एक दाक्षिणात्य अभिनेता केवळ इतकीच प्रभासची ओळख होती. पण ‘बाहुबली’ नंतर प्रभास एका रात्रीत सुपरस्टार झाला. प्रभासचा ‘बाहुबली2’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. तूर्तास सगळेजण या चित्रपटाची आतूरतेने प्रतीक्षा करीत आहेत. सोबत प्रभासच्या बॉलिवूड डेब्यूचीही लोकांना प्रतीक्षा आहे. पण खरे सांगायचे तर प्रभास बॉलिवूडमध्ये डेब्यू करून चुकला आहे, हे कदाचित तुम्हाला ठाऊक नसेल.  होय, अजय देवगणच्या ‘अ‍ॅक्शन जॅक्शन’मध्ये प्रभास दिसला होता. तोही सोनाक्षी सिन्हासोबत डान्स करताना. अर्थात त्यावेळी त्याच्याकडे कुणाचे फारसे लक्ष गेले नव्हते.
प्रभास प्रभूदेवासोबत अनेक तेलगू चित्रपटात काम करून चुकला आहे. त्यामुळे प्रभूसोबत त्याची चांगली मैत्री आहे. या मैत्रीखातर ‘अ‍ॅक्शन जॅक्शन’मध्ये कॅमिओ करण्यास प्रभास राजी झाला होता. या चित्रपटाला बॉलिवूडमध्ये फारसे यश मिळाले नाही. त्यामुळे प्रभास या चित्रपटाच्या एका गाण्यात दिसला तरी त्याला नोटीस केले गेले नाही. 



एस.एस. राजमौली दिग्दर्शित ‘बाहुबली2’ हा चित्रपट एप्रिल महिन्यात रिलीज केला जाणार आहे. मात्र प्रदर्शनापूर्वीच प्रदर्शनाच्या अधिकार विक्रीमुळे या चित्रपटाने ५०० कोटींचा गल्ला जमविला असल्याचे वृत्त आहे. ‘बाहुबली2’ हा चित्रपट हिंदीसह तेलगु, तमिळ या तीन भाषांमध्ये एकाच वेळी प्रदर्शित होणार आहे. हिंदी भाषेत प्रदर्शित होणाºया या चित्रपटाची जबाबदारी करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनने घेतली आहे, यासाठीच ही रक्कम मोजण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे.  ‘बाहुबली- द बिगिनींग’ या चित्रपटाच्या हिंदी भागासाठी १२० कोटी रुपयांना चित्रपटाचे काही हक्क विकण्यात आले होते. २०१५ मध्ये प्रदर्शित झालेला ‘बाहुबली’ हा हिंदी भाषेत ध्वनिमुद्रित झालेला आणि बॉक्स आॅफिसवर १०० कोटींपेक्षा जास्तीचा गल्ला मिळवणारा पहिलाच दाक्षिणात्य चित्रपट ठरला होता. 


गोलमाल अगेन या चित्रपटाबाबत उत्सुक आहात का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :