धडकचा ट्रेलर पाहून सैराटच्या चाहत्यांनी केली ही मागणी

सैराट या चित्रपटावर आधारित असलेल्या धडक या चित्रपटाचा ट्रेलर पाहून अनेक चाहत्यांनी धडक या चित्रपटात काही गोष्टी सैराट या चित्रपटापेक्षा वेगळ्या दाखवण्यात याव्यात अशी इच्छा प्रतिक्रियांद्वारे व्यक्त केली आहे.

धडकचा ट्रेलर पाहून सैराटच्या चाहत्यांनी केली ही मागणी
Published: 11 Jun 2018 04:22 PM  Updated: 11 Jun 2018 04:22 PM

धडक या चित्रपटाचा ट्रेलर आज लाँच झाला असून या चित्रपटाच्या ट्रेलरची आज सगळीकडे चर्चा आहे. या चित्रपटात जान्हवी कपूर आणि इशान खट्टर मुख्य 
भूमिकेत आहेत. मराठीतील सैराट ह चित्रपट प्रचंड गाजला होता. या चित्रपटातील आर्ची आणि परशाची कैमिस्ट्री प्रेक्षकांना प्रचंड भावली होती. या चित्रपटात रिंकू राजगूरूने आर्ची तर परशाची भूमिका आकाश ठोसरने साकारली होती. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली होती. मराठी चित्रपटांमध्ये या चित्रपटाने आजवर सगळ्यात चांगली कमाई केली होती. या चित्रपटाची गाणी प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतली होती. त्यामुळेच या चित्रपटाचा रिमेक करण जोहरने हिंदीत केला. सैराट या चित्रपटाच्या अखेरीस परशा आणि आर्ची यांचा खून आर्चीचा भाऊ प्रिन्सने केला असल्याचे दाखवण्यात आले होते. पण धडक या चित्रपटाचा शेवट बदलण्यात यावा, या चित्रपटात तरी नायक-नायिकेचा खून झालेला दाखवू नये अशी सैराटच्या फॅन्सची मागणी आहे.
सैराट या चित्रपटावर आधारित असलेल्या धडक या चित्रपटाचा ट्रेलर पाहून अनेक चाहत्यांनी धडक या चित्रपटाचा शेवट सैराट या चित्रपटापेक्षा वेगळा दाखवण्यात यावा अशी इच्छा ट्रेलरला दिलेल्या प्रतिक्रियांद्वारे व्यक्त केली आहे. या चित्रपटात तरी इशान आणि जान्हवीचा मृत्यू न दाखवता हॅपी एन्डिंग दाखवावी असे अनेक चाहत्यांचे म्हणणे आहे. 
धडक हा चित्रपट राजस्थानी पार्श्वभूमीवर आधारित आहे. यात जान्हवी आणि इशान खट्टर दोघेही राजस्थानी टोनमध्ये बोलताना दिसताहेत. ट्रेलरमधील जान्हवी कपूर आणि शाहिद कपूरचा भाऊ इशान खट्टर यांची केमिस्ट्रीही अफलातून आहे. चित्रपटातील अनेक सीन्स ‘सैराट’ची आठवण करून देतात, पण जान्हवी आणि इशान या नव्या कोऱ्या जोडीला पाहणे, एक नवा अनुभव आहे. तुम्हाला ठाऊक आहेच की, जान्हवीचा हा पहिला चित्रपट आहे. पण इशानचा दुसरा सिनेमा आहे. यापूर्वी इशानचा ‘बियॉन्ड द क्लाऊड्स’ रिलीज झाला आहे. या चित्रपटातील इशानच्या भूमिकेला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली होती. 

Also Read : धडक या चित्रपटात झळकणार हा मराठमोळा चेहरा


माधुरी दीक्षितचा बकेट लिस्ट बॉक्स ऑफिसवर हिट ठरेल का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :