​बेरोजगार बॉबी वाजवतोय डीजे!

सध्या बॉबी देओलचे दिवस फिरले आहेत. कुणी चित्रपटाची आॅफरच देत नसल्याने त्याने चक्क दिल्लीच्या एका क्लबमध्ये डीजेवाले बाबूचे काम पत्करले आहे.

​बेरोजगार बॉबी वाजवतोय डीजे!
Published: 30 Jul 2016 05:24 PM  Updated: 30 Jul 2016 05:24 PM

धर्मेंद्रचा मुलगा आणि सनी देओलचा भाऊ याशिवायही बॉबी देओलने बॉलिवूडमध्ये आपली एक वेगळी ओळख निर्माण केली. अनेक हिट चित्रपटातून बक्कळ कमाईही केली. परंतु सध्या बॉबीचे दिवस फिरले आहेत. कुणी चित्रपटाची आॅफरच देत नसल्याने त्याने चक्क दिल्लीच्या एका क्लबमध्ये डीजेवाले बाबूचे काम पत्करले आहे. ‘बरसात’, ‘गुप्त’, ‘सोल्जर’, ‘बिच्छू’ यासारख्या गाजलेल्या सिनेमांचा हा नायक मागच्या दहा वर्षांपासून  कामाच्या शोधात आहे. परंतु त्याला एकही चित्रपट मिळाला नाही. इतर निर्मात्यांचे सोडा त्याचा सख्खा भाऊ सनी देओलही त्याच्या मदतीला आला नाही. सनी देओलने ‘घायल वन्स अगेन’ हा सिनेमा बनवला पण यात तो स्वत:च हिरो झाला. आणि आता तर सनी स्वत:च्या मुलाला अर्थात करनला लाँच करण्याच्या तयारीत आहे. अशा स्थितीत अखेर बेरोजगार बॉबीने फार प्रतीक्षा न करता थेट दिल्ली गाठली आणि आरएसव्हीपी क्लबमध्ये डीजेचे काम सुरू केले. नशीब एकेकाचे....आणखी काय?


नाना पाटेकरचा आपला मानूस हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरेल?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :