​अखेर प्रिती झिंटा पुन्हा परतली सेटस्वर

लवकरच ती ‘भैयाजी सुपरहीट’ नावाच्या चित्रपटात आपल्याला दिसणार आहे.

​अखेर प्रिती झिंटा पुन्हा परतली सेटस्वर
Published: 29 Jul 2016 01:13 PM  Updated: 29 Jul 2016 01:13 PM

एकेकाळी आघाडीची अभिनेत्री म्हणून गणली जाणारी ‘डिंपल गर्ल’ प्रिती झिंटा अनेक वर्ष झाले रुपेरी पडद्यापासून दूर आहे. लग्न झाल्यानंतर ती पुनरागमन करेल की नाही याविषयीदेखील चर्चा केली केली जात होती.

सर्व तर्कवितर्कांना थांबवत लवकरच ती ‘भैयाजी सुपरहीट’ नावाच्या चित्रपटात आपल्याला दिसणार आहे. या चित्रपटाची शुटींग नुकतीच मुंबईच्या एका स्टुडियोमध्ये सुरू झाली असून प्रितीने फेसबुकवर सेटवरील फोटो शेअर करून याची माहिती दिली.

या फोटोज्मध्ये ती सिनेमातील सहकलाकार अमिषा पटेल, सनी देओल यांच्यासोबत सीनविषयी चर्चा करताना दिसत आहे. कॅप्शनमध्ये तिने लिहिले, सनी, अमिषा व नीरजसोबत खूप धमाल केली.



सुमारे चार वर्षांपूर्वी २०१२ मध्ये ‘भैयाजी सुपरहीट’ या चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती. मात्र काही ना काही कारणास्तव या सिनेमाला उशिर होत राहिला. आता नवीन निर्मात्यासोबत शुटींग उत्साहात सुरू असून लवकरच प्रदर्शनाची तारीख घोषित करण्यात येणार आहे. ‘राईट या राँग’ फे म नीरज पाठक चित्रपटाचा दिग्दर्शक आहे.


मराठी बिग बॉस हिट ठरणार का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :