बॉलिवुडमध्ये स्टारपुत्रांनी पदार्पण करण्यात काही नवीन नाही. आता दिग्दर्शक अब्बास यांचा मुलगा मुस्तफा चित्रपटात झळकणार आहे. त्याला अब्बास-मस्तानच लाँच करणार आहेत. मुस्तफाला लाँच करण्यासाठी ते एक अॅक्शन थ्रिलर चित्रपट बनवणार आहेत.
या चित्रपटात एक नवी अभिनेत्री झळकणार असून अभिनेता दलिप ताहिलही या चित्रपटात प्रमुख भूमिकेत असणार आहेत. या चित्रपटाचं नाव मशिन असणार असल्याची चर्चा आहे.