​ दीपिकाने केला साखरपुडा, हेमा मालिनींनी दिल्या शुभेच्छा!

ज्येष्ठ अभिनेत्री हेमा मालिनी यांनी आज दीपिकाला तिच्या साखरपुड्याच्या शुभेच्छा दिल्या. त्यांच्या या मॅसेजने सगळ्यांनाच गोंधळात टाकले. आपल्या दीपूने अर्थात दीपिका पदुकोणने कुणाशी आणि कधी साखरपुडा उरकला, हाच प्रश्न ज्याला त्याला पडला.

​ दीपिकाने केला साखरपुडा, हेमा मालिनींनी दिल्या शुभेच्छा!
Published: 28 Apr 2016 05:15 PM  Updated: 28 Apr 2016 05:17 PM

ज्येष्ठ अभिनेत्री हेमा मालिनी यांनी आज दीपिकाला तिच्या साखरपुड्याच्या शुभेच्छा दिल्या. टिष्ट्वटरवर हेमा यांनी दीपिकाला शुभेच्छा देणारा मॅसेज पाठवला. निश्चितच त्यांच्या या मॅसेजने सगळ्यांनाच गोंधळात टाकले. आपल्या दीपूने अर्थात दीपिका पदुकोणने कुणाशी आणि कधी साखरपुडा उरकला, हाच प्रश्न ज्याला त्याला पडला.
 

Deepika, All good wishes on ur engagement! Pray God both of u have a bright future, happiness & joy in ur life together

‘दीपिका तुला साखरपुड्याच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्हा दोघांचेही भावी आयुष्य सुख, समाधान व यशाने भरलेले राहो’असा शुभेच्छा संदेश हेमा यांनी दिला. दीपिका पदुकोण हिच्या चाहत्यांनी आणि टिष्ट्वटरवर तिला फॉलो करणाºयांनी जेव्हा हा मॅसेज पाहिला तेव्हा त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. दीपिका सध्या हॉलिवूडमध्ये बिझी आहे. अशास्थितीत दीपिकाने कुणाशी गुपचूप साखरपुडा उरकला, हेच अनेकांना कळायला मार्ग नव्हता. मग काय, दीपिकांच्या चाहत्यांनी यासंदर्भात थेट हेमा मालिनी यांनाच विचारणे योग्य समजले. यानंतर कुठे हेमा मालिनी यांनी खरा खुलासा केला.

No no! This is Deepika who is following me on Twitter! Not Ms Padukone!

मी दीपिका पदुकोणला नाही तर माझ्या फे्रन्ड लिस्टमध्ये असलेल्या दीपिकाला शुभेच्छा दिल्या, असे त्यांनी स्पष्ट केले. तेव्हा कुठे चाहत्यांचा जीव भांड्यात पडला...


मराठी बिग बॉस हिट ठरणार का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :