मनोज ठरला सर्वोत्कृष्ट अभिनेता

<span style="line-height: 20px;"> ‘अलिगड’ चित्रपटतील भूमिकेसाठी मनोजला ‘दादासाहेब फाळके अवॉर्ड’मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार जाहीर झाला आहे.</span>

मनोज ठरला सर्वोत्कृष्ट अभिनेता
Published: 23 Apr 2016 11:56 PM  Updated: 24 Apr 2016 12:11 AM

कॅरक्टर अ‍ॅक्टर मनोज वाजपेयी सध्य जाम खूश आहे. त्याचा ‘ट्रॅफिक’ सिनेमा प्रदर्शनाच्या मार्गावर आहे आणि त्यातच त्याला आणखी एक खूश खबर मिळाली आहे.

हंसल मेहता दिग्दर्शित ‘अलिगड’ चित्रपटतील भूमिकेसाठी मनोजला ‘दादासाहेब फाळके अवॉर्ड’मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा (क्रिटिक्स चॉईस) पुरस्कार जाहीर झाला आहे.

याची माहिती खुद्द मेहता यांनी ट्विटरवरून दिली. त्यांनी ट्विट केले की, प्राध्यापक रामचंद्र सिरस यांची भूमिका उत्तमपणे वठविण्याबद्दल मनोजची ‘दादासाहेब फाळके अवॉर्ड’च्या ‘बेस्ट अ‍ॅक्टर’ (क्रिटिक्स चॉईस) पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.



मनोजनेदेखील ट्विट करून त्याचा आनंद व्यक्त केला. तो लिहितो, माझ्या कामाचे कौतुक केल्याबद्दल धन्यवाद. या क्षणाला मी स्वत:ला अतिशय सन्मानित वाटत आहे. चाहते आणि परीक्षकांचे खूप खूप आभार.


रविवारी एका सोहळ्यात हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. वेल डन मनोज!!


मराठी बिग बॉस हिट ठरणार का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :