दिलवालेचा खरा अपराधी कोण?

 ‘बाजीराव-मस्तानी’ वि. ‘दिलवाले’ या स्पर्धेत बाजीरावने बाजी मारली. मात्र यामागे खरी कारणे कोणती असे जेव्हा प्रेक्षकांना विचारले तेव्हा पुढील गोष्टी समोर आल्या...<br />  

दिलवालेचा खरा अपराधी कोण?
Published: 16 Jan 2016 06:38 AM  Updated: 10 Feb 2016 08:25 AM

शाहरुख-काजोल अशी सुपरहीट जोडी असूनही प्रेक्षकांनी ‘दिलवाले’कडे पाठ फिरवली. यावरून आता केवळ स्टारच्या नावाखाली चित्रपटाला जाणारा प्रेक्षक आता कमी झालेला आहे असे दिसतेय. ‘बाजीराव-मस्तानी’ वि. ‘दिलवाले’ या स्पर्धेत बाजीरावने बाजी मारली. मात्र यामागे खरी कारणे कोणती असे जेव्हा प्रेक्षकांना विचारले तेव्हा पुढील गोष्टी समोर आल्या...

१. अपयशाला शाहरुख जबाबदार

SRK Kajol


शाहरूख खानने 'दिलवाले'मध्ये केवळ हिरोची भूमिका केली नाही तर त्याची कंपनी ‘रेडचिलीज’ने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. या नात्याने सर्वात मोठी जबाबदारी त्याची आहे. शाहरूख खाननंतर याची जबाबदारी रोहित शेट्टीवर टाकली जाईल. तो या चित्रपटाचे दिग्दर्शक आहे. मसाला चित्रपटांचा चॅम्पियन म्हणून रोहितचे नाव घेतले जाते. ‘दिलवाले’ला मात देण्यामध्ये संजय लीला भंसाळीचाही तितकाचा हात आहे. त्याच्या 'बाजीराव मस्तानी'ने बॉक्स आॅफिसवर त्याच दिवशी 'दिलवाले'चा सामना केला होता.

२. असहिष्णुतेचा वाद भोवला

SRk


असहिष्णुताबाबत शाहरुखने केलेल्या वक्तव्याने नाराज प्रेक्षकांनी यावेळी ‘दिलवाले’वर बहिष्कार टाकला. सोबतच चित्रपटाच्या मार्केटिंग टीमला देखील जबाबदार मानले जात आहे. विशेष म्हणजे मार्केटिंगची जबाबदारी शाहरूख व त्याची टीमने सांभाळली. या टीमला त्यांचा अतिआत्मविश्‍वासाची भोवला हे देखील तेवढेच सत्य आहे. आता समिक्षक बघताहेत की ‘दिलवाले’चा बॅँड वाजविण्यात कुणी-कुणी किती योगदान दिले आहे.

३. कथेच्या नावाखाली थिल्लरपणा

Dilwale


कथेत काहीही दम नसताना शाहरुखने हा चित्रपट स्वीकारला म्हणून तोच खरा जबाबदार आहे. शाहरूखला विश्‍वास होता की, त्याचे स्टारडम आणि रोहितने निवडलेले फॉमूर्ले (कार उडविणे आणि कॉमेडी) बॉक्स आॅफिसवर काम करतील, मात्र यावेळी असे घडलेच नाही. जेव्हा त्याच्या यशस्वी चित्रपटांची वाहवाह त्याला मिळते, तर यावेळी या अपयशाचे खापरही त्याच्याच माथी मारायला हवे.

४. रोहितचा भंपकपणा

Rohit Shetty


रोहित शेट्टीकडे शाहरूख खान-काजोलची जादुई जोडी होती. केवळ एका चांगल्या कथेची त्याला गरज होती. चित्रपटाची पटकथा व पात्रांवर मेहनत करण्याऐवजी जास्त वेळ त्याने विनाकामाच्या गोष्टींवर उगाच खर्च केला. जॉनी लीवर, संजय मिश्रा आणि वरूण शर्मा भक्कड हालचाली करताना दिसले. गोलमाल, सिंघमच्या यशाने तो भ्रमीत होता. दिलवाले सोलो प्रदर्शित झाला असता तर, तो स्वाभाविकच चित्रपटाच्याचे पहिल्या विकें डचे कलेक्शन जास्त असते आणि आतापर्यंत चित्रपट शंभर करोडचा आकडा पार करून 200 करोड क्लबच्या प्रवेशात राहीला असता.

५. बाजीरावचा इंगा

Bajirao


बाजीरावशी दिलवालेची टक्कर अचानकच नाही झाला. मात्र यावेळी भंसालीचा डाव भक्कम होता, ज्याचा अनुमान शाहरूख आणि त्याच्या टीमला आला नाही. भारताची क्रिकेट संघाने एखादा प्रतिष्ठेचा समाना गमविल्यास न्यूज चॅनलवर 'या मॅचचा अपराधीं कोण?' असे कार्यक्रम होतात. अगदी तशीच वेळ शाहरूख खानवर आली आहे. दुस‍ºया आठवड्यात 'दिलवाले'च्या बॉक्स आॅफिस कलेक्शनवर परिणाम दिसून आला.


मराठी बिग बॉस हिट ठरणार का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :