कल्कीला हवे काम!!

जिवंत अभिनयासाठी ओळखली जाणारी कल्की कोच्लिन सध्या जरा चिंतेत आहे. ही चिंता आहे ती कामाची. होय, कमर्शियल सिनेमे मिळत नसल्याने कल्की सध्या चिंतेत आहे.

कल्कीला हवे काम!!
Published: 21 Sep 2016 09:23 PM  Updated: 21 Sep 2016 09:23 PM

जिवंत अभिनयासाठी ओळखली जाणारी कल्की कोच्लिन सध्या जरा चिंतेत आहे. ही चिंता आहे ती कामाची. होय, कमर्शियल सिनेमे मिळत नसल्याने कल्की सध्या चिंतेत आहे. विशेष म्हणजे, असे का होतेयं?  हा एकच प्रश्न सध्या तिला छळतो आहे. ‘मला कमर्शिअल सिनेमांचे प्रस्ताव मिळणे बंद झाले आहे. असे का होतेय,मला माहिती नाही. कदाचित मी स्वत: स्वत:च्या बनवलेल्या प्रतिमेची बळी ठरते आहे,’ असे कल्की म्हणाली. सध्या मी ‘आजमाइश ट्रायल्स आॅफ लाईफ’या वृत्तचित्रात काम करतेय. याद्वारे देशभर फिरून लोकांचे देशाप्रतिच्या भावना जाणून घेतल्या जाणार आहेत. देशात काय बदलावे, कसे बदलावे, हे लोकांकडून जाणून घेण्यात येणार आहे, असेही तिने सांगितले.
कल्कीने ‘देव डी’,‘शैतान’,‘दॅट गर्ल इन यलो बुट्स’ अशा वेगळ्या धर्तीच्या चित्रपटात भूमिका केल्या आहेत.  ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’,‘ये जवानी है दीवानी’ यासारख्या चित्रपटांद्वारे तिने आर्ट व कमर्शिअल चित्रपटांत संतुलन साधण्याचे प्रयत्न केले.


गोलमाल अगेन या वर्षातील सगळ्या चित्रपटांचे रेकॉर्ड मोडणार का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :