​‘साहो’मध्ये दिसणार अनुष्का शेट्टीचा ग्लॅम अल्ट्रा लूक!!

‘बाहुबली2’मध्ये अमरेन्द्र बाहुबली आणि देवसेना यांची मॅजिक केमिस्ट्री दिसली. आता ‘साहो’मध्ये सुद्धा ही जोडी एकत्र येतेय. होय,‘साहो’मध्ये ‘देवसेना’ अर्थात अनुष्का शेट्टी हिचीही वर्णी लागली असल्याचेही कन्फर्म झालेय. पण यात अनुष्का एकदम सेक्सी अवतारात दिसणार आहे.

​‘साहो’मध्ये दिसणार अनुष्का शेट्टीचा ग्लॅम अल्ट्रा लूक!!
Published: 08 Jun 2017 10:28 AM  Updated: 08 Jun 2017 10:28 AM

‘बाहुबली2’नंतर सगळ्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. होय, ‘बाहुबली’ प्रभासचा ‘साहो’ या चित्रपटाने प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली आहे. चित्रपटाचे शूटींग सुरु व्हायचेय, त्याआधीच हा चित्रपट बहुप्रतिक्षीत चित्रपटांच्या यादीत जावून बसला आहे. यात प्रभास दमदार अ‍ॅक्शन करताना दिसणार आहे. १५० कोटी इतका मोठा बजेट असलेल्या या चित्रपटासाठी सुप्रसिद्ध स्टंट कोरिओग्राफर केनी बेट्स यांची मदत घेण्यात आली आहे. ‘बाहुबली2’सोबत आपण ‘साहो’चा टीजर बघितला. त्यातील प्रभासचा लूकही आपण बघितला. अमरेन्द्र बाहुबलीपेक्षा पुरता वेगळा पण तितकाच हवा हवासा! 
‘बाहुबली2’मध्ये  अमरेन्द्र बाहुबली आणि देवसेना यांची मॅजिक केमिस्ट्री दिसली. आता  ‘साहो’मध्ये सुद्धा ही जोडी एकत्र येतेय. होय,‘साहो’मध्ये ‘देवसेना’ अर्थात अनुष्का शेट्टी हिचीही वर्णी लागली असल्याचेही कन्फर्म झालेय.  पण यात अनुष्का एकदम सेक्सी अवतारात दिसणार आहे.  ‘साहो’मधील प्रभासची एक झलक तुम्ही टिजरमध्ये बघितली आहे. अर्थात अनुष्काचा ‘साहो’मधील लूक अद्याप समोर यायचाय. पण सूत्रांचे मानाल तर अनुष्का एकदम हटके लूकमध्ये दिसेल. लहेंगा, साडीमध्ये नाही तर ‘साहो’मध्ये अनुष्का वेस्टर्न अस्ट्रा ग्लॅम लूकमध्ये दिसेल. ‘साहो’साठी अनुष्का सध्या बराच घाम गाळतेय. ‘बाहुबली’दरम्यान अनुष्काचे वजन बरेच वाढले. कारण यादरम्यान ती जखमी झाली होती.  पण ‘साहो’मध्ये ती अगदी सेक्सी फिगरमध्ये दिसेल. एकंदर काय, तर ‘साहो’मधील अनुष्काला पाहून हीच ती देवसेना का? असा प्रश्न तुम्हाला पडल्यावाचून राहणार नाही. आजपासून हैदराबादेत ‘साहो’चे शूटींग सुरु होत आहे. होय, प्रभास सुट्टीवरून परतला आहे आणि कामासाठी सज्ज झाला आहे. आता त्याच्या व अनुष्काच्या ‘साहो’चीच तेवढी काय ती आम्हाला प्रतीक्षा आहे.


कंगना राणौतचा सिमरन हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरेल का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :