​ आमिर खानला लिहायचेयं आत्मचरित्र; पण आहे एक अट!

खरे तर आमिरचा हा इंटरेस्टिंग प्रवास पुस्तकरूपात वाचणे कुणालाही आवडेल. आमिरलाही आपले आयुष्य पुस्तकरूपात मांडायला आवडेल. पण यासाठी त्याची एक अट आहे.

​ आमिर खानला लिहायचेयं आत्मचरित्र; पण आहे एक अट!
Published: 03 Oct 2017 03:35 PM  Updated: 03 Oct 2017 03:35 PM

सुपरहिट फिल्म आणि आमिर खान असे जणू अलीकडे एक समीकरण झाले आहे. आमिरचा प्रत्येक चित्रपट हिट होणारच हे अगदी ठरलेलेच. पण आमिरचे मानाल तर कुठल्याही सुपरस्टारच्या भरवशावर चित्रपट सुपरहिट होऊ शकत नाही. एका मुलाखतीत आमिर यावर बोलला. चित्रपटांच्या यशाचे व अपयशाचे श्रेय केवळ सुपरस्टारला दिले जाऊ शकत नाही. ‘पीके’ हिट झाला, तो माझ्यामुळे नाही. तर त्याची कथा मुळातच चांगली होती. कुठलाच सुपरस्टार चित्रपट हिट करू शकत नाही. माझ्या मते, चित्रपट अभिनेत्याला सुपरस्टार बनवतात. सुपरस्टार केवळ ओपनिंग आणू शकतो. चित्रपट चांगला नसेल तर तो त्याला हिट करू शकत नाही, असे आमिर म्हणाला.

स्टारडम मिळण्यामागे कुठलाही तर्क नसतो, असे आमिर मानतो. माझ्या ३० वर्षांच्या कारकिर्दीत मला स्टारडम कसे मिळाले आणि मी हे कसे करू शकलो, हे मला ठाऊक नाही. स्टारडम केवळ सात-आठ वर्षांचे असते, हे मला माझ्या आईचे सांगणे आहे. ज्या व्यवसायात जोखीम कमी आहे, अशात व्यवसायात मी जावे, अशी माझ्या आईची इच्छा होती. पण मी सर्वाधिक असुरक्षित मानल्या जाणाºया इंडस्ट्रीत आलो आणि इथलाच बनून राहिलो. माझ्यामते, स्टारडम मिळवण्यामागे कुठलाही तर्क नसतो, असे तो म्हणाला.

ALSO READ : ​ होय, आमिर खानच्या ‘दंगल’ने मोडला आमिरच्याच ‘3इडियट्स’चा विक्रम!

खरे तर आमिरचा हा इंटरेस्टिंग प्रवास पुस्तकरूपात वाचणे कुणालाही आवडेल.  आमिरलाही आपले आयुष्य पुस्तकरूपात मांडायला आवडेल. पण  यासाठी त्याची एक अट आहे. तो म्हणतो, मी माझ्या आयुष्यावर पुस्तक लिहून ते सिलबंद करून ठेवेल. माझ्या मृत्यूनंतरच या आत्मचरित्राचे प्रकाशन व्हावे, असे मी माझ्या वकीलाला सांगून जाईल. माझ्या हयातीत माझ्या आत्मचरित्राचे प्रकाशन व्हावे, अशी माझी इच्छा नाही. तूर्तास स्वत:च्या आयुष्यावर बायोपिक बनवण्यात काहीही राम नाही, असेही आमिरचे मत आहे. सध्या तरी माझ्यावर बायोपिक बनवण्यात काहीही शहाणपण नाही. कारण लोकांना माझ्याबद्दल सगळे काही ठाऊक आहे. अर्थात पुढच्या ५० वा १०० वर्षांनंतर माझ्यावर बायोपिक बनवले जाऊ शकते, असे आमिर म्हणाला.


नाना पाटेकरचा आपला मानूस हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरेल?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :