​आमिर खान फातिमासोबत नव्हे तर कॅटरिना कैफ करणार रोमान्स!!

आमिर खानचा ‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’ सध्या चांगलाच चर्चेत आहे. या चित्रपटासाठी फातिमा सना शेख हिचे नाव फायनल झाले तेव्हा प्रत्येकाचाच गैरसमज झाला होता. पण आता सगळे सूर्यप्रकाशाइतके स्वच्छ झाले आहे.

​आमिर खान फातिमासोबत नव्हे तर कॅटरिना कैफ करणार रोमान्स!!
Published: 15 May 2017 11:27 AM  Updated: 15 May 2017 11:27 AM

आमिर खानचा ‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’ सध्या चांगलाच चर्चेत आहे. या चित्रपटासाठी फातिमा सना शेख हिचे नाव फायनल झाले तेव्हा प्रत्येकाचाच गैरसमज झाला होता. होय, आमिर व फातिमा या दोघांमध्ये लव्ह अँगल असेल, असे सगळे समजून बसले होते. कारण दोघांनीही आपल्या यापूर्वीच्या चित्रपटात म्हणजेच ‘दंगल’मध्ये बाप आणि मुलीची भूमिका साकारली होती. पहिल्या चित्रपटात बाप-लेक आणि लगेच दुसºया चित्रपटात प्रियकर-प्रेयसी, हे अनेकांना पचनी पडलेले नव्हते. अर्थात ‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’ची कथा कुणालाही माहित नव्हती. पण आता सगळे सूर्यप्रकाशाइतके स्वच्छ झाले आहे. होय, ‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’मध्ये आमिर व फातिमा या दोघांमध्ये नाही तर आमिर व कॅटरिना कैफ या दोघांमध्ये लव्ह अँगल असणार आहे. या चित्रपटात आमिर कॅटरिनासोबत आॅनस्क्रीन रोमान्स करताना दिसणार आहे.



या चित्रपटात फातिमा सना शेख ही एका फायटरची भूमिका साकारणार आहे. म्हणजेच चित्रपटात फातिमा जबरदस्त अ‍ॅक्शन करताना दिसेल. सूत्रांचे मानाल तर, ‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’मध्ये दोन अभिनेत्रींची गरज होती. एक प्रचंड सक्षम. जी आमिरच्या टोळक्याचा भाग असेल. ही भूमिका फातिमाच्या वाट्याला आली. यासाठी फातिमाला कडक ट्रेनिंग घ्यावे लागणार आहे. दुसरी अभिनेत्री चित्रपटात एका ब्रिटीश मुलीच्या भूमिकेत दिसेल. ही भूमिका कॅटरिना करणार आहे.

ALSO READ : आमिर खानच्या ‘Thugs’ टीममध्ये कॅटरिना कैफची एन्ट्री!!

दिग्दर्शक विजय कृष्णन यांचे मानाल तर,  दोन्ही अनिनेत्रींची भूमिका तोडीची आहे.यापूर्वी कॅटरिना व आमिर हे दोघे ‘धूम4’मध्ये एकत्र दिसले होते. ‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’च्या निमित्ताने ही जोडी पुन्हा एकदा स्क्रीन शेअर करणार आहे.   


पद्मावती चित्रपटाला होत असलेला विरोध योग्य आहे असे तुम्हाला वाटते का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :