Exclusive : अदांज-ए-परिणिती

काही किलो वजन कमी केल्यानंतर परिणीती अधिक सुंदर, आकर्षक दिसू लागली आहे. ‘अ न्यू पर्सन इन अ न्यू बॉडी’, असे आम्ही नाही तर खुद्द परिणीतीच म्हणतेय. परिणीतीची सध्याची सेक्सी फिगर म्हणजे जीभेवर संपूर्ण ताबा, काटेकोर वेळापत्रक आणि जीममध्ये सतत दीड वर्षे गाळलेला घाम याचा परिणाम आहे. याच पार्श्वभूमीवर परिणीतीने सीएनएक्स डिजिटलशी मनमोकळ्या गप्पा मारल्या.

Exclusive : अदांज-ए-परिणिती
Published: 25 Jul 2016 08:14 PM  Updated: 27 Jul 2016 04:51 PM

- जान्हवी सामंत

परिणीती चोपडा ही बॉलिवूडची गुणी अभिनेत्री.‘ढिशूम’मधील ‘जानेमन आह..’ या गाण्यात वरूण धवनसोबतचा हॉट रोमान्स व किसींग सीन यामुळे परिणीती सध्या चर्चेत आहे. याशिवाय आॅस्कर विजेता चित्रपट निर्माता स्टीवन स्पीलबर्ग याच्या ‘दी बीएफजी’ या अ‍ॅनिमेटेड चित्रपटाला परिणीती आपला आवाज देणार असल्याने त्याचीही चर्चा आहे. पण सर्वाधिक चर्चा आहे ती, परिणीतीच्या वेट लॉसची. होय, काही किलो वजन कमी केल्यानंतर परिणीती अधिक सुंदर, आकर्षक दिसू लागली आहे. ‘अ न्यू पर्सन इन अ न्यू बॉडी’, असे आम्ही नाही तर खुद्द परिणीतीच म्हणतेय. परिणीतीची सध्याची सेक्सी फिगर म्हणजे जीभेवर संपूर्ण ताबा, काटेकोर वेळापत्रक आणि जीममध्ये सतत दीड वर्षे गाळलेला घाम याचा परिणाम आहे. याच पार्श्वभूमीवर  फिटनेस ते फिगर आणि वर्तमान ते भविष्य काळातील प्रोजेक्ट आदींवर परिणीतीने सीएनएक्स डिजिटलशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. तिच्याशी रंगलेल्या गप्पांचा हा सारांश खास आमच्या वाचकांसाठी...

प्रश्न : स्टीवन स्पीलबर्गच्या ‘दी बीएफजी’ या चित्रपटातील मुख्य अभिनेत्रीला तू आपला आवाज देणार आहेस. हा अनुभव कसा राहिला?
परिणीती : निश्चितपणे वेगळा अनुभव होता. हिंदी डबसाठी माझा आवाज देण्याआधी हा चित्रपट पाहण्याची इच्छा मी व्यक्त केली आणि चित्रपट पाहिल्यानंतर मी अक्षरश:  चित्रपटाच्या प्रेमातच पडले. तशीही स्टीवन स्पीलबर्गची मी खूप मोठी चाहती आहे. त्याच्या चित्रपटाचा भाग बनताना आनंद आणि अभिमान दोन्हीही वाटले. मला केवळ माझ्या आवाजातून भावना व्यक्त करायच्या होत्या. निश्चितपणे हे आव्हानात्मक होते आणि हे करतानाचा अनुभव प्रचंड आनंददायी होता.

प्रश्न : तुझ्या मेकओवरबद्दल काय सांगशील?
परिणीती : हा बदल निश्चितपणे कठीण होता पण आता तो तेवढाच समाधान देणारा ठरतो आहे. एक अभिनेत्री म्हणून माझ्यासाठी मेकओवर महत्त्वपूर्णच होता. माझ्या  दैनंदिन आयुष्यातील काही चुकीच्या सवयी,जीभेवर ताबा असे सगळे नवे व चांगले बदल स्वीकारण्याची हीच योग्य वेळ होती. केवळ आकर्षक फिगर नाही तर फिट राहण्यासाठी मी स्वत:ला बदलले, काही चांगल्या सवयी जाणीवपूर्वक स्वत:त रूजवल्या. यासाठी प्रचंड कष्ट घ्यावे लागले. पण यामुळे मला माझा नव्याने शोध लागला. माझ्या इच्छाशक्तीचा शोध मला घेता आला. खाण्याच्या सवयी बदलणे सोपे नाही. पण मी केले. यानंतरचे समाधान मी सध्या अनुभवते आहे.

प्रश्न : अलीकडे तू वजन आणि फिगरबाबत बोलू लागली आहे. अभिनयाच्या क्षेत्रात आकर्षक फिगर किती महत्त्वाचे आहे?
परिणीती : खूप महत्त्वाचे आहे. ‘लेडिज वर्सेस रिकी बहेल’ माझे गोलमटोल शरीर माझ्या भूमिकेला साजेसे होते. ‘इशकजादे’मध्येही मी जशी होते अगदी तशीच फिट बसले. माझ्यामते, अभिनयात देहबोलीचा ८० टक्के  वाटा असतो. पण मला ग्लॅमरस वा बोल्ड बिनधास्त अशा भूमिका साकारायच्या असतील तर माझे शरीर तेवढेच आकर्षक असायला हवे. माझ्या मेकओवरनंतर एक अभिनेत्री म्हणून अनेक संधींची कवाडे माझ्यासाठी खुली झाली आहेत.



प्रश्न : ‘जानेमन’ची चर्चा जोरात आहे. वरूण धवनसोबतच्या या सुपरहिट गाण्याबाबत काय सांगशील?
परिणीती : जाम मज्जा आली. शूट करताना मी खूप धम्माल केली. या गाण्यासाठी परफेक्ट लूक व एनर्जी कमावणे माझे लक्ष्य होते आणि व्हीडी(वरूण धवन)ने मला यात खूप मदत केली,त्यामुळे त्याचे आभार मानायलाच हवेत. जॉननेही मला काही टीप्स दिल्यात. एनर्जी लेवल वाढवण्यासाठी काय खावे, कधी खावे, कधी खाऊ नये, अशा अनेक टीप्सचे रिझल्ट तुम्हाला गाण्यात दिसत आहेत. शूटींगदरम्यान मज्जाच आली. व्हीडी चांगला डान्सर आहे. त्याने मला खूप प्रेरणा व प्रोत्साहन दिले.

प्रश्न : आणि या गाण्यातील ‘गाजलेल्या किस’बद्दल काय सांगशील?
परिणीती : (हसत हसत) ओह, ती तर पूर्णपणे व्हीडीची कल्पना होती. तो मला किस करणार , हे मलाही ठाऊक नव्हते. त्याने गाण्याच्या अखेरीस कॅमेरा आॅन असताना अचानक मला किस केले आणि मीच नाही तर सेटवरचे सगळेच आश्चर्यचकीत झालेत. पण नेमक्या त्याच शॉटची सगळ्यात जास्त चर्चा झाली. वरूणचा तो किस माझ्यासाठी नव्हता तर त्याच्यावर जीव ओवळणाºया त्याच्या तरूणींसाठी होता.

प्रश्न :  या नव्या जनरेशनची अभिनेत्री म्हणून तू स्वत:कडे कशी बघतेस?
परिणीती : नव्या पिढीची अभिनेत्री म्हणून माझ्याजवळ वेगवेगळ्या संधी आहेत. केवळ अभिनयच नाही तर त्याशिवायही अनेक गोष्टी आजच्या अभिनेत्री करताहेत. फॅशन, सिंगींग, सोशल वर्क, रिअ‍ॅलिटी शो, रायटींग असे काय काय, करण्याच्या संधी आहेत. विशेष म्हणजे प्रेक्षककांनीही या वेगवेगळ्या भूमिकेत आम्हाला पसंती दिली आहे. माझ्या वयाच्या अभिनेत्रींकडे सध्या वेगवेगळ्या संधी आहेत, वेगवेगळी आव्हाने आहेत.

प्रश्न : हा झाला चांगला भाग. वाईट भाग असलाच तर तो कोणता?
परिणीती : निश्चितपणे चांगले तसेच काही वाईटही असणारच. स्वत:च्या भावना मारून अनेकदा कॅमेºयासमोर अभिनय करावा लागतो. मी अतिशय हळवी आहे. एखादवेळी मन दु:खी असते पण कॅमेºयासमोर चेहºयावर दु:खाची पुसट रेषाही दिसू देता येत नाही. कॅमेºयापुढे अभिनय करता करता खरे आयुष्यही ‘अभिनय’ बनून जातं. पण शेवटी हे काम आहे आणि माझे काम मला उत्तमपणे करायचे आहे, हेच खरे. त्यामुळेच इट्स ओके.

प्रश्न : भावी आयुष्याकडे कधी बघतेस?
परिणीती : सर्वात महत्त्वाचे म्हणजे उत्तम आरोग्यावर माझा भर राहणार आहे. कामाच्या बाबतीत म्हणाल तर  ‘ढिशूम’ आणि ‘बीएफजी’ एकाच दिवशी रिलीज होत आहेत. यातील माझा वाटा फार मोठा नाही. पण तरिही मी या दोन्ही चित्रपटांची आतूरतेने प्रतीक्षा करतेय. आयुष्यमान खुराणासोबतचा ‘मेरी प्यारी बिंदू’ लवरकच पूर्ण होणार आहे. या चित्रपटात मी सिंगर आहे आणि आयुष्यमान लेखक बनला आहे. या चित्रपटाकडूनही मला खूप अपेक्षा आहेत. प्रेक्षकांना हा चित्रपट नक्की आवडेल, असा मला विश्वास आहे. यानंतर यूएस ड्रिम टूर आहे. आम्ही अमेरिकेतल्या सहा शहरांमध्ये परफॉर्म करणार आहोत. मी स्टेज शो केलेला नाही. त्यामुळे मी यासाठीही कमालीची उत्सूक आहे.


मराठी बिग बॉस हिट ठरणार का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :