​ 'मला Stereotype मोडायला आवडते'

इरफान खूप कमी शब्द वापरणारा मनुष्य आहे. पण जेव्हा तो बोलतो, तेंव्हा अत्यंत काळजीपूर्वक आणि उद्देशपूर्ण बोलतो. कला, सिनेमा, अध्यात्म किंबहुना धार्मिक विषयांवर तो निर्णयाप्रत बोलतो. काही वर्षापूर्वी त्याने आपले ‘खान’ हे आडनाव काढून टाकले होते. धार्मिक विधीसंदर्भात लोक तमाशा करतात या त्याच्या वक्तव्यावरुन वाद उफाळून आला आहे. एखादी बाजू घेण्यास त्यास लज्जास्पद वाटत नाही. त्यामुळे कदाचित त्याला ‘नॉन ग्लॅमरस’ असेही म्हटले जाते. इरफानचा मदारी हा चित्रपट लवकरच रसिकांच्या भेटीला येतोय. याचनिमित्ताने सीएनएक्सच्या एडिटर जान्हवी सामंत यांनी इरफानशी साधलेला हा संवाद...

​ 'मला Stereotype मोडायला आवडते'
Published: 04 Jul 2016 01:38 PM  Updated: 04 Jul 2016 01:38 PM


इरफान खूप कमी शब्द वापरणारा मनुष्य आहे. पण जेव्हा तो बोलतो, तेंव्हा अत्यंत काळजीपूर्वक आणि उद्देशपूर्ण बोलतो. कला, सिनेमा, अध्यात्म किंबहुना धार्मिक विषयांवर तो निर्णयाप्रत बोलतो. काही वर्षापूर्वी त्याने आपले ‘खान’ हे आडनाव काढून टाकले होते. धार्मिक विधीसंदर्भात लोक तमाशा करतात या त्याच्या वक्तव्यावरुन वाद उफाळून आला आहे. एखादी बाजू घेण्यास त्यास लज्जास्पद वाटत नाही. त्यामुळे कदाचित त्याला ‘नॉन ग्लॅमरस’ असेही म्हटले जाते.  इरफानचा मदारी हा चित्रपट लवकरच  रसिकांच्या भेटीला येतोय. याचनिमित्ताने सीएनएक्सच्या एडिटर जान्हवी सामंत यांनी इरफानशी साधलेला हा संवाद...

मदारी चित्रपटाचा निर्माता आणि अभिनेता म्हणून तू कसा जोडला आहेस?

ही पित्याची आणि मुलाची कथा आहे. त्याशिवाय दु:खद घटना घडल्यानंतर शहर आणि त्यातील नागरिकांचीही आहे. महापूर अथवा बॉम्बस्फोटानंतर शहरातील लोक कशा पद्धतीने विचार करतात, त्यांच्या आशंका आणि असुरक्षितता, त्याचप्रमाणो या घटनेनंतर त्यांच्यावर कोणता परिणाम होतो या संदर्भाचीही ही नाटय़मय कथा आहे. मी याच्या स्क्रीप्टमधून गेलो आहे, खूप मजा आली. निशिकांतला दिग्दर्शन करण्यासाठी मी सांगितले. त्यानंतर माङया असं लक्षात आलं की ही केवळ परंपरागत पद्धतीची कथा नाही. निर्मात्याच्या शोधासाठी वेळ घालविण्याअगोदर मीच याची निर्मिती करण्याचे ठरविले.

तू या चित्रपटात काम करतो आहेस आणि निर्माताही आहे, त्यामुळे चित्रपटातील तुझा सहभाग अधिक आहे?

अगदीच नाही! मला अभिनय करायला आवडतो आणि त्यात मी सर्वोत्तम करु शकतो. अभिनेता म्हणून मी जीव ओतून काम करतो. मी लंचबॉक्सची देखील निर्मिती केली होती. निर्माता म्हणून, भूमिका वेगळी असते. निर्मात्याच्या दृष्टीने माङया ज्ञानाची क्षेत्रे पाहता निर्णय मर्यादित ठेवतो. माङया टीमला जे चांगले वाटते, त्याकडे मी अधिक लक्ष देतो.बॉलीवूडमध्ये सध्या मार्केटिंगचा जमाना आहे.

कथांवर आधारित सिनेमाच्या दृष्टीने, ज्याला या इंडस्ट्रीत समांतर सिनेमा म्हटले जाते, त्याचा भाग म्हणून तुला हे मार्केटिंग किती महत्वाचे वाटते?

यापूर्वीच्या जमान्यात समांतर सिनेमे हे अगदी वेगळ्या पद्धतीचे होते, यावर माझा विश्वास आहे. आर्थिकदृष्टय़ा, कथानकाच्या दृष्टीकोनातून आणि दर्शकांचा विचार करता हे सर्व काही वेगळे आहे. सध्याच्या जमान्यात कमी आशय असलेल्या चित्रपटांना उधाण आले आहे. तेच लोकप्रिय होत आहेत. आम्हाला यासाठी वेगळ्या व्याख्या आणि परिभाषांची गरज आहे. सुदैवाने सध्या आमच्याकडे चांगले सिनेमा पाहणारे दर्शक आहेत. लोकांना चांगल्या संकल्पना आवडतात. त्यांना वेगवेगळ्या गोष्टी हव्या आहेत. त्यांना भरविलेल्या गोष्टी नको आहेत. बौद्धिक चित्रपटांची त्यांना अपेक्षा आहे आणि त्याचे ते स्वागतही करतात. आमच्याकडे निशिकांत कामत, शुजीत सरकार, दिबाकर बॅनर्जी, नवदीप सिंग यांच्यासारखे उत्तम काम करणारे दिग्दर्शक आहेत. असे चित्रपट निर्माण होणो गरजेचे आहे. अशा चित्रपटांना संधी मिळणो आवश्यक आहे. या ठिकाणी छोटय़ा चित्रपटांसाठी मार्केटींग महत्वाचे ठरते. अशा सिनेमांना व्यापक स्थान मिळणो आणि मुख्य प्रवाहातील चित्रपटांविरुद्ध उभे राहण्यासाठी मार्केटिंग त्यांना मदत ठरु शकते.

मुख्य प्रवाहातील सिनेमांना मिळणारे यश आणि त्यावर होणारी टीका ही देखील व्यापक आहे. तू हॉलीवूडच्या मुख्य प्रवाहातील चित्रपटात काम केले आहे. प्रमुख अभिनेत्यांपेक्षाही तुङो अधिक कौतुक होते. चर्चेत नसलेल्या कलाकारापासून ते आतार्पयतचा तुझा प्रवास कसा आहे?

हो, हे अगदी खरंय! मी चर्चेत नसलेला साधा कलाकार आहे. मला मिळालेली ही एकमेव स्पेस आहे आणि मी ती ठेवू इच्छितो. मला चर्चेत न राहण्याविषयी काहीही वाटत नाही. मी स्टारडमही गांभीर्याने घेत नाही. सुरुवातीच्या काळात माङया असं लक्षात आलं की ठराविक काळात अभिनेत्यांचा स्लॉट येतो आणि त्याचा साचा तयार होण्याकडे कल असतो. अशा ठराविक पद्धतीचा कल आपण मोडला पाहिजे. त्यामुळे मी प्रत्येक वेळा नवीन काही तरी करण्याचा प्रयत्न करतो, जेणोकरुन माङयातला तोच तोपणा संपला पाहिजे. मला माङया पद्धतीने आव्हाने स्वीकारणो आवडते. त्याचवेळी मला हे देखील सांगितले पाहिजे, माझ्याकडे येणा-या चित्रपटातूनच मला माझा मार्ग निवडावा लागतो. माझी निवड ही काम करते आहे, याचा मला आनंद आहे.

हॉलीवूडमध्ये चमकलेल्या काही कलाकारांपैकी तू एक आहे. हे कसे साध्य झाले?

त्याचा खूप मोठा अनुभव आहे. हॉलीवूड हे अगदी वेगळे आहे. त्यांची काम करण्याची पद्धत, व्यावसायिकता अगदी हटके आहे. चित्रपटातील त्यांच्या भूमिकेची लांबी पाहून अभिनेते चित्रपट स्वीकारत नाहीत तर त्या कथेत त्यांचे किती योगदान आहे, यावर त्यांची निवड अवलंबून असते. केवळ भूमिका पाहून नव्हे तर संपूर्ण प्रोजेक्टमध्ये निर्मितीसोबत ते काम करु इच्छितात. मी काही मोठय़ा प्रोजेक्टसोबत काम केले. त्यांच्यासोबत काम करताना मला खूप काही शिकायला मिळाले हे सांगायला मला लाज वाटत नाही. लाईफ ऑफ पाय, इन्फर्नोबरोबरच स्पायडरमॅन हा देखील माझ दृष्टीने महत्वाचा चित्रपट आहे.

भविष्यात तू कोणते चित्रपट करतो आहेस?

येत्या काही महिन्यात इन्फर्नो प्रदर्शित होईल. माङो स्वत:चे होम प्रॉडक्शन आहे, मी आणखी एका हॉलीवूडपटात काम करत आहे. बालाजीसोबत मी मजेदार चित्रपटाबाबत चर्चा सुरू आहे. चांगल्या अभिनयाची भूमिका असणा:या भूमिका करण्याकडे माझा कल आहे. मी प्रेमकथा करु इच्छितो. उत्तम लव्ह स्टोरी अथवा संगीतमय.


माधुरी दीक्षितचा बकेट लिस्ट बॉक्स ऑफिसवर हिट ठरेल का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :