​अमित सध सांगतोय, बिग बॉस ठरला करियरचा टर्निंग पॉईंट

सुलतान, काय पो छे यांसारख्या चित्रपटात झळकेला अमित सध सरकार 3 आणि रनिंगशादी डॉट कॉम या चित्रपटात आता महत्त्वाच्या भूमिका साकारणार आहे. बिग बॉस त्याच्या करियरचा टर्निंग पॉईंट ठरला असे तो सांगतोय.

​अमित सध सांगतोय, बिग बॉस ठरला करियरचा टर्निंग पॉईंट
Published: 16 Jan 2017 06:25 PM  Updated: 16 Jan 2017 12:55 PM

क्यो होता है प्यार या मालिकेद्वारे अमित सधने त्याच्या अभिनयकारकिर्दीला सुरुवात केली. अनेक मालिकांमध्ये काम केल्यानंतर तो चित्रपटांकडे वळला. काय पो छे, सुलतान यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये त्याने महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. तो आता रनिंगशादी डॉट कॉम, सरकार 3 यांसारख्या चित्रपटात झ  त्याच्या आजवरच्या कारकिर्दीबाबत त्याच्याशी मारलेल्या गप्पा...

तू छोट्या पडद्यापासून कारकिर्दीला सुरुवात केली आहेस. तुझा हा अभिनयप्रवास कसा सुरू झाला?
अभिनयक्षेत्रात यायचे असे मी लहानपणीच ठरवले होते. त्यामुळे मी शिक्षण सोडून दिले आणि अभिनयाकडे वळलो. मी कधीच कॉलेजला गेलो नाही. मी अनेक ठिकाणी ऑडिशन देत होतो. त्यातूनच क्यो होता है प्यार या मालिकेसाठी माझी निवड झाली. माझी पहिलीच मालिका प्रेक्षकांना आवडली आणि मला अनेक ऑफर्स मिळायला लागल्या. बिग बॉसच्या पहिल्याच सिझनमध्ये मी होतो. या कार्यक्रमामुळे तर मला प्रचंड प्रसिद्धी मिळाली. 

तू छोट्या पडद्यावर काम केले आहेस, आजच्या मालिकांविषयी आणि छोट्या पडद्याविषयी तुला काय वाटते?
मला माझ्या व्यग्र शेड्युलमुळे छोट्या पडद्यावरचे कार्यक्रम पाहायला मिळत नाहीत. आजचा छोटा पडदा हा खूप बदलला आहे. ते एक मोठे मीडियम बनले आहे. मला आज जे काही यश मिळाले आहे, ते माझ्या मालिकांमुळेच मिळाले आहे. त्यामुळे छोटा पडदा हा माझ्यासाठी नेहमीच स्पेशल आहे. भविष्यात एखादी चांगली भूमिका ऑफर झाली तर मला नक्कीच पुन्हा छोट्या पडद्यावर काम करायला आवडेल.  

रनिंगशादी डॉट कॉम या चित्रपटात तू जोडप्यांना पळून जाण्यासाठी मदत करताना प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेस. खऱ्या आयुष्यात तू कोणत्या जोडप्याला पळवण्यास मदत केली आहेस का?
रनिंगशादी डॉट कॉम या चित्रपटात मी आणि तापसी पन्नू लग्न करण्यास उत्सुक असणाऱ्या जोडप्यांना पळून जाण्यासाठी मदत करणार आहोत. यासाठी आम्ही खास एक वेबसाईटदेखील सुरू केली असल्याचे या चित्रपटात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. मी 15-16 वर्षांचा असेन, त्यावेळी एका जोडप्याला घरातून लग्न करायला परवानगी मिळत नव्हती. त्यामुळे आम्ही त्या मुलीला पळवून आणले होते. पण त्यांचे लग्न लावून देऊ असे वचन मुलीच्या मावशीने दिले असल्याने आम्ही तिला सुखरूपपणे घरी पोहोचवले. पण त्यानंतर त्यांनी ते वचन तोडले आणि दहा वर्षं तिला घराच्या बाहेरच पडून दिले नव्हते. आपल्या भारतात धर्म, जात, गोत्र यांमुळे अनेकांना लग्न करण्यासाठी आपल्या कुटुंबियांचा विरोध सहन करावा लागतो. आज ही आपल्या देशातील एक भरपूर मोठी समस्या बनली आहे असे मला वाटते. 

सुलतान, काय पो छे यांसारख्या चित्रपटात तू खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेस, तू इतक्या वर्षांनंतर तुझ्या भूमिका अतिशय चोखंदऴपणे निवडत आहेस का?
मी माझ्या करियरच्याबाबतीत कधीच प्लानिंग केलेले नाही. एखाद्या भूमिकेची ऑफर आल्यानंतर ती मला कितपत आवडते यावरच तो चित्रपट करायचा की नाही हे मी ठरवतो. मी अभिनयाला वेळ देण्यासोबतच माझ्या इतर छंदानाही तितकाच वेळ देतो. मी ट्रेकिंग करतो, लाँग ड्राईव्हवर जातो, माझे आयुष्य मी आनंदाने जगतो. 



बाहुबली 2 पाहाण्यास उत्सुक आहात का ?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :