लहान वयातील प्रेम निष्पापच - अंजली पाटील

आठ वर्षांच्या मुलाचे आपल्या दीदीवर प्रेम जडते, याबाबतची गोष्ट ‘मेरी निम्मो’ या चित्रपटात दाखविण्यात आली आहे, त्यानिमित्त अंजली पाटीलशी साधलेला संवाद...

लहान वयातील प्रेम निष्पापच - अंजली पाटील
Published: 27 Apr 2018 08:42 PM  Updated: 27 Apr 2018 08:42 PM

सतीश डोंगरे

‘प्रेम’ या शब्दाचा अर्थही माहीत नसलेल्या वयात जेव्हा तुमचे मन एखाद्या व्यक्तीच्या अवतीभोवती फिरते तेव्हा त्या नात्यात निरागसता आणि निष्पापपणा असतो. अर्थातच हे वय म्हणजेच लहानपण असते. या वयात होणाºया प्रेमात कुठलाही स्वार्थ, अपेक्षा नसते तर त्याचा सहवास हवाहवासा असतो. त्या व्यक्तीने आपल्याला कधीच सोडून जाऊ नये एवढीच भावना आपल्या मनात असते. अभिनेत्री अंजली पाटील हिने तिच्या ‘मेरी निम्मो’ या चित्रपटानिमित्त ‘सीएनएक्स’शी संवाद साधला असता, तिने वरील भावना व्यक्त केली. 

प्रश्न : लहान वयात होणाºया प्रेमाला भावनिकतेशी जोडले जाते, याविषयी तू सहमत आहेस काय?
- मला असे वाटते की, लहान वयात एखाद्या मोठ्या व्यक्तीवर होणाºया प्रेमाचा संबंध भावनिकतेशी नसून निष्पाप आणि निरागसतेशी असतो. ‘मेरी निम्मो’ या माझ्या चित्रपटात हेच दाखविण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. खरं तर या वयात प्रत्येकालाच आपल्या जवळच्या व्यक्तीवर प्रेम जडत असतं. मात्र या प्रेमात स्वार्थ किंवा अपेक्षा नसतात. ते पूर्णत: निष्पाप असतं. त्या व्यक्तीचा आपल्याला आयुष्यभर सहवास लाभावा हा एकच हेतू असतो. हे नातं मनाला स्पर्श करणारे असते.

प्रश्न : तू नेहमीच वेगळ्या धाटणीच्या चित्रपटांची निवड करीत असते, या यादीत आता ‘मेरी निम्मो’ या चित्रपटालाही स्थान द्यायला हवे काय?
- होय, या चित्रपटाची कथादेखील वेगळ्या धाटणीचीच आहे. जेव्हा या चित्रपटाची स्क्रिप्ट माझ्याकडे आली तेव्हा आठ वर्षांच्या मुलाची त्याच्या दीदीच्या वयाच्या मुलीबरोबर लव्हस्टोरी दाखविली जाणार असल्याचे मी त्यात वाचले. पण त्याचबरोबर ही लव्हस्टोरी खूपच निष्पाप असल्याचीही मला जाणीव झाली. खरं तर असे प्रेम प्रत्येकाच्याच आयुष्यात येत असते अन् त्यात गैरही काही नाही असे मला वाटते. समोरच्या व्यक्तीचे वय काय यापेक्षा त्याच्याशी जुळलेली नाळ हाच या नात्यातील दुवा असतो. 

प्रश्न : बालकलाकार करण दवेबरोबर काम करतानाचा अनुभव कसा सांगशील?
- एका वाक्यात सांगायचे झाल्यास, मला पुन्हा एकदा माझे बालपण अनुभवता आले. करण खूपच गुणी आणि हुशार मुलगा आहे. शिवाय त्याच्या कामातही तो निपुण असल्याचे मला दिसून आले. त्यामुळे मला हे आवर्जून सांगावेसे वाटेल की, त्याच्याकडून मला बºयाच गोष्टी शिकायला मिळाल्यात. आम्ही सेटवर खूप धमाल केली. खरं तर माझ्यासमोर हुशारक्या मारण्यासाठी एकही मोठा अभिनेता नसल्याने करणसोबत काम करताना मला त्याच्या वयाप्रमाणेच लहान होण्याची संधी मिळाली. तसेच चॉकलेट, पिझ्झा, चिंचा या पदार्थांचा आस्वादही घेता आला. प्रश्न : हल्ली डिजिटल प्लॅटफॉर्मवर चित्रपट प्रदर्शित करण्याचे प्रमाण वाढत आहे, याचे फायदे-तोटे कसे सांगशील?
- विदेशांमध्ये डिजिटल प्लॅटफॉर्मवर चित्रपट प्रदर्शित करण्याची पद्धत बºयाच वर्षांपासून आहे. आपल्याकडे गेल्या काही वर्षांमध्ये याबाबतचे प्रमाण वाढत असून, ही सकारात्मक बाब असल्याचे मला वाटते. कारण भारतात इंटरनेट  वापरणाºयांचे प्रमाण वाढत असून, येथील प्रेक्षक आपल्या आवडी-निवडी जोपासताना दिसत आहे. कारण सर्वांनाच मारधाड किंवा रोमॅण्टिक चित्रपट आवडतात असे नाही. काहींना फिचर फिल्म, सोशल फिल्म किंवा इतर प्रकारच्या चित्रपटांमध्ये रूची असल्याने त्यांना डिंजिटल प्लॅटफॉर्मवर अशाप्रकारचे चित्रपट निवडणे शक्य होत आहे. हाच विचार करून आम्ही ‘मेरी निम्मो’ हा चित्रपट डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित केला आहे. 

प्रश्न : आगामी काळातील तुझ्या प्रोजेक्ट्सविषयी काय सांगशील?
- राकेश ओमप्रकाश मेहरा यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘मेरे प्यारे प्राइममिनिस्टर’ या वेगळ्या विषयावर आधारित चित्रपटात मी एक महत्त्वाची भूमिका साकारत आहे. त्याचबरोबर सायली संजीव, सुव्रत जोशी यांच्याबरोबर एक मराठी चित्रपटही करीत आहे. त्याचबरोबर दिग्दर्शन क्षेत्रातही मी याचवर्षी पदार्पण करणार आहे. येत्या जुलै महिन्यात माझ्या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात होईल. हा चित्रपट माझ्यासाठी स्पेशल असेल सध्या एवढेच त्याविषयी मला सांगावेसे वाटते. 


माधुरी दीक्षितचा बकेट लिस्ट बॉक्स ऑफिसवर हिट ठरेल का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :