ग्लॅमरस अंदाजात झळकूनही हिंदी सिनेमातून रिया सेनला मिळत नाही समाधान!

बॉलिवूडच्या सिनेमात काम करताना फार मजा आली नसल्याचं रियाला वाटतं. त्यामुळेच तिने आपला मोर्चा इतर भाषिक सिनेमाकडे वळवला. बंगाली दिग्दर्शकांनी आपल्याला चांगल्या भूमिका ऑफर केल्या.त्या भूमिकांमध्ये काही तरी वेगळं सांगण्यासारखं होतं.

ग्लॅमरस अंदाजात झळकूनही हिंदी सिनेमातून रिया सेनला मिळत नाही समाधान!
Published: 10 Oct 2017 02:02 PM  Updated: 10 Oct 2017 02:02 PM

अभिनेत्री रिया सेन हिनं वयाच्या 19व्या वर्षी 'स्टाइल' या सिनेमातून तिने हिंदी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवलं. मात्र काही मोजके सिनेमांचा अपवाद वगळता तिला बॉलिवूडमध्ये फारसं यश मिळालं नाही. 'स्टाइल', 'झनकार बीट्स' आणि 'अपना सपना मनी मनी' या सिनेमातून तिनं रसिकांची मनं जिंकली खरी मात्र आज रियाकडे हाताच्या बोटावर मोजता येतील इतकेच सिनेमा आहेत.करियरच्या सुरुवातीपासूनच रियाकडे सेक्सी अभिनेत्री म्हणूनच पाहिलं गेलं आणि त्याप्रकारच्या भूमिका तिला मिळत गेल्या. मात्र आता रियाला सेक्सी भूमिकांचा वीट आला आहे. त्यामुळेच अशा भूमिका मला नको असंच जाहीर करुन टाकलं आहे. सेक्सी या शब्दाचा अर्थच नेमका काय हे आजवर कुणालाच कळला नाही असं रियाला वाटतं. हिंदी सिनेमा दिग्दर्शकांना वाटतं की आपण कायम मिनी स्कर्ट परिधान करावा, अंगप्रदर्शन  करावं. मात्र या सगळ्या गोष्टींना सेक्सी म्हणत नाहीत असं रियाला वाटतं. सेक्सी म्हणजे एखाद्या व्यक्तीची पर्सनालिटी. आपल्याला कुणीही सेक्सी म्हटलं तर आवडेल. मात्र तरीही बॉलिवूडच्या सिनेमात काम करताना फार मजा आली नसल्याचं रियाला वाटतं. त्यामुळेच तिने आपला मोर्चा इतर भाषिक सिनेमाकडे वळवला. बंगाली दिग्दर्शकांनी आपल्याला चांगल्या भूमिका ऑफर केल्या. त्या भूमिकांमध्ये काही तरी वेगळं सांगण्यासारखं होतं. केवळ लोकांना सेक्सी आवडतं म्हणून कमी कपड्यात मला दाखवणं असं त्यांनी काही केलं नाही. अशा प्रकारच्या भूमिका मला आता करायला आवडतील असं रियानं म्हटलं आहे. डोकं नसलेली एक अभिनेत्री अशी माझी जी प्रतिमा निर्माण झाली आहे ती आता बदलायची आहे असंही रियानं सांगितलं आहे. हेच सिद्ध करण्यासाठी मला बंगाली सिनेमांनी मोठी मदत केली हे सांगायला ती विसरली नाही.रियानं काही दिवसांपूर्वी आलेल्या 'लोन्ली गर्ल' या शॉर्ट फिल्ममध्ये काम केलं होतं.यांत तिनं समलैंगिक भूमिका साकारली होती.बॉलिवूडमध्ये चुकीच्या वेळी एंट्री मारली असंही तिला वाटतं. ज्यावेळी सिनेसृष्टीत पाऊल ठेवलं त्यावेळी लहान होतो आणि फारशी जाण नव्हती.इथलं वातावरण, लोक यांची माहिती नव्हती असं रियाला वाटतं. मात्र काळानुरुप वयानुसार आपल्यात बदल झाले असून चांगलं काय,वाईट काय याची समज आल्याचं तिने सांगितले आहे. आगामी काळात काही तरी वेगळेपण, नाविन्य असेल अशा भूमिका साकारण्याची इच्छा आहे असं तिने म्हटलं आहे. 

Also Read:जेव्हा रिया सेनने चक्क वेटरकडेच केली होती या गोष्टीची डिमांड?रियल लाईफमध्येही आहे खुपच Bold


नाना पाटेकरचा आपला मानूस हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरेल?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :