​जॉनमुळे झाली ‘फोर्स २’ची अ‍ॅक्शन कमी

बुडापेस्टमध्ये शुटींग दरम्यान जॉनच्या पायाला दुखापत झाली आणि समस्येला सुरुवात झाली.

​जॉनमुळे झाली ‘फोर्स २’ची अ‍ॅक्शन कमी
Published: 06 Nov 2016 04:43 PM  Updated: 06 Nov 2016 11:13 AM

बॉलीवूड हंक जॉन अब्राहम त्याच्या जबरदस्त शरीरयष्टीसाठी ओळखला जातो. स्टंट आणि अ‍ॅक्शन स्किलमुळे दिग्दर्शक त्याला आपल्या चित्रपटात घेतात. परंतु एका दिग्दर्शकाचे अल्टीमेट अ‍ॅक्शन फिल्म बनवण्याचे स्वप्न अपूर्णच राहिले. तो दिग्दर्शक म्हणजे अभिनव देव.

‘फोर्स २’च्या ट्रेलरमध्ये तुम्हाला सिनेमातील हाय स्टँडर्ड अ‍ॅक्शनची झलक पाहायला मिळते. पण यापेक्षा जास्त हायर लेव्हलचे स्टंट आणि अ‍ॅक्शन करण्याची अभिनवची इच्छा होती. आणि जॉनसारखा हीरोसोबत असल्यामुळे त्याचा आत्मविश्वासही वाढला. बुडापेस्टमध्ये शुटींग दरम्यान जॉनच्या पायाला दुखापत झाली आणि समस्येला सुरुवात झाली.

तो सांगतो, ‘दरवाजाला लाथ मारण्याच्या सीनमध्ये त्याच्या पायाला दुखापत झाली. सुरुवातीला आम्हाला वाटले फारशी गंभीर जखम नाही. दवाखान्यात उपचार घेतल्यावर दुसऱ्या दिवशी शूटींग पुन्हा सुरु झाली. पण त्याचा त्रास वाढला. मग गुडघ्यावर छोटी शस्त्रक्रिया करावी लागली. आता चित्रपट पूर्ण कसा होणार हा प्रश्न होता.’

                               

                               

दोन आठवड्यांच्या विश्रांतीनंतर जॉन सेटवर परतला. काळजी म्हणून अ‍ॅक्शनची तीव्रता कमी करण्यात आली. त्यामुळे तुम्ही चित्रपटात पाहणार त्याहून अधिक इंटेन्स अ‍ॅक्शन चित्रपटात पाहायला मिळू शकले असते. मात्र अभिनवला याचे दु:ख नाही.

त्याच्या मते, जॉनला काही झाले नाही यातच तो समाधानी आहे. तो फार मेहनती अभिनेता आहे. एवढी दुखापत होऊनही त्याने अवघड स्टंट लीलया साकारले. त्याच्या जागी जर दुसरा असता तर हा चित्रपट पूर्ण झालाच नसता, असेही तो म्हणाला.

निशिकांत कामत दिग्दर्शित ‘फोर्स’ सिनेमाचा हा सिक्वेल असून सोनाक्षी सिन्हा यामध्ये मुख्य अभिनेत्री आहे. हे वर्ष जॉनला फारसे यशस्वी ठरलेले नाही. त्यामुळे ‘फोर्स २’कडून त्याला खूप अपेक्षा आहेत.


कंगना राणौतचा सिमरन हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरेल का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :