सोनम कपूरने म्हटले, ‘सेक्ससाठी लग्नाची प्रतीक्षा करीत नाहीत मुली’!

सध्या सोनम कपूर तिच्या आगामी ‘वीरे दी वेडिंग’ या चित्रपटामुळे भलतीच चर्चेत आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिने म्हटले की, सेक्ससाठी लग्नाची प्रतीक्षा करीत नाहीत मुली, हेच दाखविण्याचा चित्रपटात प्रयत्न केला गेला.

सोनम कपूरने म्हटले, ‘सेक्ससाठी लग्नाची प्रतीक्षा करीत नाहीत मुली’!
Published: 24 May 2018 06:05 PM  Updated: 24 May 2018 06:06 PM

‘वीरे दी वेडिंग’ हा बहुचर्चित चित्रपट सर्वसामान्य मसाला चित्रपटांसारखा नसून, मॉडर्न विचारांच्या तरुणींच्या जगण्याची रित सांगणारा आहे. चित्रपटात अतिशय बिंधास्त, बोल्ड दृश्य आणि तेवढेच बोल्ड डायलॉग्स बघावयास मिळणार आहेत. चित्रपटात करिना कपूर-खान, सोनम कपूर-आहुजा, स्वरा भास्कर आणि शिखा तल्सानिया यांच्या तोंडून प्रचंड शिव्या असणारे डायलॉग ऐकावयास मिळणार आहेत. ज्यामुळे सेन्सॉर बोर्डाने आतापर्यंत चित्रपटाला सर्टिफिकेट दिले नाही. मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सेन्सॉरने चित्रपटाला ‘ए’ सर्टिफिकेट दिले आहे. हा चित्रपट १ जून रोजी प्रदर्शित होणार आहे. सध्या संपूर्ण टीम चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. चित्रपटातील स्टारकास्ट विविध प्रसारमाध्यमांना मुलाखती देत आहेत. वास्तविक चित्रपटाचा ट्रेलर समोर येताच लोकांनी त्यास अतिशय बिंधास्तपणे प्रतिक्रिया दिल्या आहेत. ज्यामध्ये चित्रपटातील शिव्या देणारे डायलॉग्स, ड्रिंक, स्मोकिंग आणि लग्नाअगोदर सेक्स यांसारख्या मुद्द्यांवर प्रश्न उपस्थित केले आहेत. 
 

 

A post shared by Veere Di Wedding (@vdwthefilm) on


याच मुद्द्यावर एका यू-ट्यूब चॅनेलला मुलाखत देताना सोनमने म्हटले की, ‘मला नाही वाटत की, असे प्रश्न कधी पुरुषांना विचारले जातील. जसे की, दारू का पितो?, स्मोकिंग का  करतो?, शिवीगाळ का करतो? तसेच सेक्शुअली अ‍ॅक्टिव्ह का आहेस?’ सोनमच्या याच मुद्द्यावर तिचे समर्थन करताना स्वराने म्हटले की, ‘हे कोणीच म्हटले नाही की, हा चित्रपट स्त्रीवादी आहे किंवा महिला सक्षमीकरणावर आधारित आहे. कारण लोकांनी केवळ चार शहरी मुलींना त्यांची बिंधास्त लाइफस्टाइल जगताना बघितले आहे. ज्या शिवीगाळ करतात, ड्रिंक सुद्धा करतात. त्यामुळे आम्हाला असे वाटते की त्यात काही विशेष वाटू नये. 
 
 

A post shared by Veere Di Wedding (@vdwthefilm) on


याचदरम्यान, सोनमने म्हटले की, आम्ही सेक्शुअली अ‍ॅक्टिव्ह आहोत आणि लग्नापर्यंत सेक्सची प्रतीक्षा करू शकत नाहीत. हे सर्व काही वास्तविक जीवनात राजरोसपणे घडत आहे. आम्ही चित्रपटात हेच दाखविण्याचा प्रयत्न करीत आहोत, मग त्यात वाइट काय आहे? या मुलाखतीदरम्यान सोनम कपूरने ‘प्यार का पंचनामा’ या चित्रपटातील अत्यंत वाइट डायलॉग्सवरही बोट ठेवले. जे महिलांच्या विरोधात वापरण्यात आले होते. तिने म्हटले की, लोकांनी या चित्रपटाला चांगली पसंती दिली. शिवाय त्यातील डॉयलॉगवर कोणी आक्षेपही घेतला नाही. पुढे सोनमने म्हटले की, आम्ही एका चित्रपटाची निर्मिती केली, जो मनोरंजनात्मक तर आहेच, शिवाय वास्तववादी आहे. 
 


माधुरी दीक्षितचा बकेट लिस्ट बॉक्स ऑफिसवर हिट ठरेल का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :