​एकेकाळी बोल्ड आणि सेक्सी इमेजसाठी प्रसिध्द होती ‘ही’ अभिनेत्री, पाहा UNSEEN PHOTO !

80 च्या दशकात आपल्या बोल्ड आणि सेक्सी इमेजसाठी ओळखली जात होती ही अभिनेत्री !

​एकेकाळी बोल्ड आणि सेक्सी इमेजसाठी प्रसिध्द होती ‘ही’ अभिनेत्री, पाहा UNSEEN PHOTO !
Published: 02 Apr 2017 06:50 PM  Updated: 02 Apr 2017 06:50 PM

-Ravindra More
असे म्हटले जाते की, लग्नानंतर हीरोइनचे करियर संपते, परंतु एका अभिनेत्रीने आपल्या करियरची सुरुवात लग्नानंतरच नाही तर एका मुलीची आई झाल्यानंतर सुरु केले. ती अभिनेत्री म्हणजे जुन्या काळातील प्रसिध्द अ‍ॅक्ट्रेस सुचित्रा सेनची मुलगी मुनमुन सेन होय. मुनमुन सेनने हिंदी व्यतिरिक्त बंगाली, तमिळ, तेलुगु, मल्याळम, कन्नड आणि मराठी भाषेतील फिल्ममध्ये काम केले आहे. मुनमुनचे शिक्षण शिलॉन्ग आणि कोलकातामध्ये झाले. ती आर्टसोबतच सोशल अ‍ॅक्टिव्हिटीजमध्ये नेहमी पुढे असते, याच कारणाने तिने लग्नाअगोदर एक मुल दत्तक घेतले. तिने 1978 मध्ये त्रिपुराच्या रॉयल फॅमिलीमधील भरत देव वर्षा यांच्यासोबत लग्न केले. 1979 मध्ये तिने मोठी मुलगी राइमाला जन्म दिला. मुनमुनची डेब्यू फिल्म ‘अंदर-बाहर’ राइमाच्या जन्माच्या 5 वर्षांनंतर 1984 मध्ये रिलिज झाली होती. हा सिनेमा जास्त चालला नाही परंतु याची प्रशंसा झाली.
मुनमुन सेन 80 च्या दशकात आपल्या बोल्ड आणि सेक्सी इमेजसाठी ओळखली जात होती. ती अनेक मॅगझीनच्या कव्हरवर बोल्ड पोझ देताना दिसली आहे. 
 मुनमुन सेनने 1984 मध्ये फिल्म ‘अंदर-बाहर’ मधून डेब्यू केला. यानंतर तिने मुसाफिर, मोहब्बत की कसम, जाल, शीशा और प्या की जीत सारख्या फिल्ममध्ये काम केले. परंतु तिच्या जास्तीत जास्त फिल्म अपयशी ठरल्या. यानंतर ती टिव्हीकडे वळली.
2014 मध्ये मुनमुनने ममता बॅनजीर्ची तृणमूल काँग्रेस जॉइन केली आणि बांकुरामधून लोकसभा निवडणुक जिंकली. तिने सीपीआयमधून 9 वेळा सांसद असलेल्या बासुदेव आचार्यला हरवले.
मुनमुन सेनला आंध्रप्रदेश सरकारने 1987 मध्ये फिल्म ‘श्रीवेनेला’ साठी बेस्ट सपोर्टिंग अ‍ॅक्ट्रेसचा अवॉर्ड दिला.
मुनमुन सेनची सासु इला देवी कूचबिहारची महाराणी इंदिरा राजेची मुलगी होती. इला देवी जयपुरची महाराणी गायत्री देवीची मोठी बहिण होती.
मुनमुन सेनला कलाकेंद्र स्क्रीन अवॉर्ड, भारत निर्माण अवॉर्ड आणि कलाकार अवॉर्ड मिळाला आहे.मराठी बिग बॉस हिट ठरणार का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :