ट्विंकल खन्नाने म्हटले, ‘जर मासिक पाळी आली नसती तर जगात कोणीच जन्माला आले नसते’!

‘पॅडमॅन’ या चित्रपटानिमित्त ट्विंकल खन्नाने दिलेल्या एका मुलाखतीत मासिक पाळीवर अतिशय स्पष्टपणे भाष्य केले. तिने म्हटले की, जर मासिक पाळी आली नसती तर जगात कोणीच जन्माला आले नसते.

ट्विंकल खन्नाने म्हटले, ‘जर मासिक पाळी आली नसती तर जगात कोणीच जन्माला आले नसते’!
Published: 09 Feb 2018 05:39 PM  Updated: 09 Feb 2018 05:46 PM

दिग्दर्शक आर. बाल्की यांचा ‘पॅडमॅन’ हा चित्रपट आज प्रदर्शित झाला. चित्रपटाची निर्माती ट्विंकल खन्नाने नुकतेच या चित्रपटाच्या अनुषंगाने एका मुलाखतीत आपले मत व्यक्त केले. तिने म्हटले की, मासिक पाळी ही एक सामान्य प्रक्रिया आहे. त्यामुळे यावर बोलताना संकुचितपणा वाटू देऊनये. जर महिलांना मासिक पाळीच आली नसती तर जगात कोणीही जन्माला येऊ शकले नसते. आपल्या समाजातील प्रत्येकाने मासिक पाळीबद्दल त्यांच्या मनात असलेली चुकीची भावना बदलायला हवी. ‘पॅडमॅन’च्या माध्यमातून लोकांचा हा विचार बदलेल अशी अपेक्षा वाटत असल्याचेही ट्विंकलने सांगितले. 

पुढे बोलताना ट्विंकलने म्हटले की, मी मासिक पाळीविषयी अनेक लेख लिहिले. याचदरम्यान मला मुरुगनाथम यांची स्टोरी समजली. ही स्टोरी ऐकून मी खूपच प्रभावित झाली. कारण त्यांची ही स्टोरी मला प्रोत्साहित करणारी वाटली. ही स्टोरी अशा व्यक्तीची आहे, ज्याने आपल्या पत्नीसाठी एवढे मोठे पाऊल उचलले. पुढे मी मुरुगनाथम यांची कथा चित्रपटाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचविण्याचा निर्णय घेतला. हे करण्यामागे एकच उद्देश होता तो म्हणजे याविषयी लोकांच्या विचारात परिवर्तन व्हावे. 

ALSO READ : Padman review : गंभीर विषयावर हलक्या फुलक्या शब्दांत भाष्य करणारा पॅडमॅन

ट्विंकलने हेदेखील सांगितले की, आता टीव्हीवर येणाºया सॅनिटरी नॅपकिनच्या जाहिरातींमध्ये बदल बघावयास मिळेल. या जाहिरातीमध्ये निळ्या रंगाचा पदार्थ दाखविला जातो. परंतु पुढील काळ्यात निळ्याऐवजी लाल रंगाचा पदार्थ दाखविण्यात येईल. त्याचबरोबर मासिक पाळीविषयी मोकळेपणाने सांगितले जाईल. त्याचबरोबर प्रत्येकवेळी दुकानदार महिलांना सॅनिटरी पॅड पेपर किंवा काळ्या रंगाच्या कॅरिबॅगमध्ये देतात. हे पुढच्या काळात बघावयास मिळणार नसल्याचेही ट्विंकलने म्हटले. 


मराठी बिग बॉस हिट ठरणार का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :