अमिताभच नाही तर या अभिनेत्यांसोबतही रेखा यांचे जुळले सूत,तरीही सुखी संसाराचं स्वप्न अधुरंच!

रेखा यांच्या सौंदर्यावर त्यांचे अनेक सहकलाकार फिदा झाले. त्यामुळेच कित्येक कलाकारांशी रेखा यांचं नाव जोडलं गेलं.विविध सिनेमातून अमिताभ-रेखा जोडीनं रसिकांच्या काळजात अढळ स्थान मिळवलं. दोघांच्या अनोख्या केमिस्ट्रीमुळे आणि सिनेमाच्या यशामुळे रिअल लाइफमध्ये दोघं आणखी जवळ आले. अमिताभ आणि रेखा लग्न करणार अशा चर्चाही रंगल्या. मात्र तसं काहीच घडलं नाही.

अमिताभच नाही तर या अभिनेत्यांसोबतही रेखा यांचे जुळले सूत,तरीही सुखी संसाराचं स्वप्न अधुरंच!
Published: 10 Oct 2017 10:46 AM  Updated: 10 Oct 2017 10:46 AM

हिंदी चित्रपटसृष्टीच्या अभिनेत्री आणि बॉलिवूड दिवा रेखा यांच्या अभिनयावर सारेच फिदा आहेत. त्यांच्या अभिनयासह त्यांचं घायाळ करणारं सौंदर्य याची जादू आजही रसिकांवर कायम आहे. मग हीच जादू त्यांच्यासोबत काम केलेल्या त्यांच्या सहकलाकारांवर झाली नसती तरच नवल. रेखा यांच्या सौंदर्यावर त्यांचे अनेक सहकलाकार फिदा झाले. त्यामुळेच कित्येक कलाकारांशी रेखा यांचं नाव जोडलं गेलं. 


'सावन भादो' या पहिल्याच सिनेमातून रेखा चर्चेत आल्या. हा सिनेमा हिट ठरला. या सिनेमातील रेखा यांचे नायक अभिनेता नवीन निश्चल हे होते. सिनेमात काम करताच दोघांमध्ये एक नातं निर्माण झालं. यानंतर रेखा आणि नवीन निश्चल यांनी विविध सिनेमात एकत्र काम केलं. 
रेखा आणि विनोद मेहरा यांनी ब-याच सिनेमात एकत्र काम केलं. काम करता करता दोघांमध्ये एक प्रेमाचं नातं निर्माण झालं. दोघंही लग्नबंधनात अडकले. मात्र विनोद मेहरा यांच्या मनातील पत्नी रेखा बनू शकल्या नाही. इतकंच नाही तर विनोद मेहरा यांच्या मातोश्रींनाही रेखा सून म्हणून मान्य नव्हत्या. त्यावेळी आई आणि पत्नी यापैकी एकाची निवड करण्यास रेखा यांनी विनोद मेहरा यांना सांगितलं. त्यावेळी विनोद मेहरा यांनी प्रेमाऐवजी आपल्या आईला निवडलं होतं. 
विनोद मेहरा यांच्याप्रमाणेच अभिनेता किरण कुमारसुद्धा रेखा यांच्या सौंदर्यावर फिदा होते. रेखा यांच्याशी गुपचुप लग्न करुन त्यांना घरी घेऊन येण्याची तयारी किरण कुमार यांनी केली होती. लग्न करुन नववधू बनलेली रेखा किरण कुमार यांच्या घरी पोहचली. त्यावेळी रुपेरी पडद्यावर महिलांवर अत्याचार करणारे  खलनायक म्हणून प्रसिद्ध असलेले अभिनेता आणि किरण कुमार यांचे वडील जीवन यांनी रेखाला आपली सून मानण्यास आणि गृहप्रवेश देण्यास नकार दिला. नववधूच्या रुपात आलेल्या रेखा यांना घराची एक पायरीही चढता आली नव्हती असं त्यावेळी बोललं गेलं. यामुळेच रेखा यांच्या आयुष्यातून किरण कुमारही निघून गेले. रेखा यांची जीवनकहानी पुढे अभिनेता अमिताभ बच्चन यांच्याशी जोडली गेली. 'दो अनजाने' हा या जोडीचा पहिला सिनेमा. या सिनेमापासूनच अमिताभ-रेखा जोडी रसिकांना भावली. यानंतर विविध सिनेमातून अमिताभ-रेखा जोडीनं रसिकांच्या काळजात अढळ स्थान मिळवलं. दोघांच्या अनोख्या केमिस्ट्रीमुळे आणि सिनेमाच्या यशामुळे रिअल लाइफमध्ये दोघं आणखी जवळ आले. अमिताभ आणि रेखा लग्न करणार अशा चर्चाही रंगल्या. मात्र तसं काहीच घडलं नाही.


त्याच काळात अमिताभ-रेखा-जया यांच्या प्रत्यक्ष जीवनात सुरु असलेल्या उलथापालथीचं चित्रण करणारा 'सिलसिला' हा सिनेमा रसिकांच्या भेटीला आला. यांत अमिताभ-रेखा यांचं अव्यक्त प्रेम, त्यांची केमिस्ट्री सिनेमातील विविध सीन्स आणि गाण्यांमधून रसिकांना पाहायला मिळाली. त्यानंतर अमिताभ-रेखा एका सिनेमात कधीच झळकले नाही. विविध कार्यक्रमांमध्ये दोघंही एकमेंकांपासून खूप लांब लांब बसल्याचं पाहायला मिळतं. मात्र कॅमे-याच्या नजरा त्या दोघांवरच असतात. एखाद्या क्षणी दोघं चुकून समोरा समोर आले तर त्याचीही बातमी बनते. त्यामुळेच अमिताभ आणि रेखा यांची लव्हस्टोरी आजही रसिकांसाठी फार मोठं कोडं आहे. सिनेसृष्टीतील ज्या ज्या नायकाशी रेखा यांचं नाव जोडलं गेलं तो प्रत्येक नायक रेखा यांचं मन दुखावून त्यांच्यापासून दूर गेला. मात्र त्यानंतर रेखा यांनी एका बिझनेसमनशी लग्न केलं. मुकेश अग्रवाल असं या बिझनेसमनं नाव होतं. मात्र लग्नाला एक वर्षही पूर्ण झालं नव्हतं, त्यावेळी मुकेश यांनी आपल्या फार्म हाऊसमध्ये आत्महत्या केली. रेखा आणि मुकेश यांच्यात काही तरी बिनसलं आणि त्यामुळेच त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं अशा चर्चा त्यावेळी रंगल्या. यानंतर रेखा पुन्हा एकदा जीवनात एकट्या पडल्या. आजही त्यांचा एकाकी जीवनप्रवास सुरु आहे. 


नाना पाटेकरचा आपला मानूस हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरेल?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :