​तमन्ना भाटियाची होणार ‘बोलती बंद’!

बाहुबली’नंतर तमन्ना भाटियाच्या लोकप्रीयतेने अशी काही उंची गाठली की, सगळेच अवाक् झालेत. पण आता ‘बाहुबली’नंतर तमन्नाची ‘बोलती’ बंद होणार आहे.

​तमन्ना भाटियाची होणार ‘बोलती बंद’!
Published: 16 Apr 2017 02:18 PM  Updated: 16 Apr 2017 02:18 PM

कधीकाळी ‘फ्लॉप’ असा शिक्का माथी बसलेल्या तमन्ना भाटियाचे भाग्य एका चित्रपटाचे अक्षरश: पालटले. होय, ‘बाहुबली’नंतर तमन्नाच्या लोकप्रीयतेने अशी काही उंची गाठली की, सगळेच अवाक् झालेत. पण आता ‘बाहुबली’नंतर तमन्नाची ‘बोलती’ बंद होणार आहे. घाबरू नका, कारण तमन्नाच्या चाहत्यांसाठी बातमी आनंदाची आहे. होय, ‘बाहुबली’नंतर तमन्ना लवकरच बॉलिवूडमध्ये दिसणार आहे. निर्माता वाशू भगनानी यांनी तमन्नाला साईन केले आहे. या चित्रपटात तमन्ना उंचीने कमी म्हणजेच एका ठेंगू आणि मुक्या मुलीची भूमिका साकारताना दिसणार आहे.
अलीकडे एका मुलाखतीत तमन्ना तिच्या भूमिकांबद्दल बोलली होती. मला वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिका करायला आवडेल, असे ती म्हणाली होती. या नव्या चित्रपटातील भूमिका वेगळीच नाही तर आव्हानात्मकदेखील आहे. तमन्नासाठी यापेक्षा चांगली संधी कुठली असू शकते. खरे तर ‘क्वीन’ या सुपरडुपर हिट चित्रपटाच्या तामिळ रिमेकमध्ये तमन्ना दिसणार होती. पण आता हा चित्रपटच गुंडाळण्यात आला आहे. एकंदर काय, तर एक संधी तमन्नाच्या हातून गेलीय. पण एका आव्हानात्मक भूमिकेच्या निमित्ताने एक नवी संधी तिची प्रतीक्षा करतेय.

तूर्तास तमन्ना या चित्रपटाबद्दल मौन बाळगून आहे. ‘तूतक तूतिया’नंतर मी पुन्हा एकदा प्रभु देवासोबत काम करणार आहे. हा चित्रपट अतिशय वेगळा चित्रपट असेल, एवढेच तमन्नाने सांगितलेय. यापेक्षा अधिक काहीही बोलायला ती तयार नाही. अर्थात तिच्या या चित्रपटाबद्दलची ताजी माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहूच. 
तमन्नाला सध्या ‘बाहुबली2’ची प्रतीक्षा आहे. या आठवड्याच्या अखेरिस हा चित्रपट प्रदर्शित होतो आहे.
 

हाफ गर्लफ्रेंड हिंदी मीडियमवर भारी पडेल असे तुम्हाला वाटते का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :