IIFA 2017 : सुशांत सिंग राजपूतचे ‘आयफा’शी असलेले जुने नाते तुम्हाला माहीत आहे काय?

​तुमच्यात जिद्द असेल तर अशक्य वाटणारी गोष्टही तुम्ही सहज शक्य करू शकता, सुशांत सिंग राजपूत हे त्याचे उत्तम उदाहरण आहे.

IIFA 2017 : सुशांत सिंग राजपूतचे ‘आयफा’शी असलेले जुने नाते तुम्हाला माहीत आहे काय?
Published: 15 Jul 2017 10:13 PM  Updated: 15 Jul 2017 10:13 PM

२००६ मध्ये इंजिनिअरिंग सोडल्यानंतर अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या जीवनात गेल्या ११ वर्षांपासून खूप बदल झाला आहे. अभिनयाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सुशांतने कॉलेज सोडून मुंबई गाठली. पुढे २०१३ मध्ये ‘काय पो चे’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू करीत आपल्यातील अभिनयाची चुणूक दाखविली. शिवाय अनेक ब्रॅण्डचा तो फेव्हरेटही बनला. आज सुशांतकडे अनेक चित्रपटांच्या आॅफर्स आहेत. वास्तविक सुशांतच्या फिल्मी करिअरची सुरुवात तशी रंजकच म्हणावी लागेल. कारण बॅकग्राउंड डान्सर ते अभिनेता असा प्रवास त्याला करावा लागला. बॅकग्राउंड डान्सर म्हणून त्याने अनेक आयफा सोहळ्यांमध्ये परफॉर्मन्स केला. मात्र आज तो आयफामध्ये एक अभिनेता म्हणून उपस्थित आहे. खरं तर सुशांतचे आयफाचे नाते तसे जुने आहे. 

जेव्हा सुशांतने आपल्या करिअरची सुरुवात केली होती तेव्हा तो एका डान्स ग्रुपमध्ये सहभागी झाला होता. पुढे तो आयफासारख्या प्रतिष्ठित पुरस्कार सोहळ्यात डान्सर म्हणून परफॉर्मन्स करीत होता. आज नशिबाने सुशांत पुन्हा आयफात उपस्थित आहे, परंतु सुरुवातीचा काळ अन् आताचा काळ यात बराचसा फरक म्हणावा लागेल. कारण त्यावेळी तो एक डान्सर म्हणून आयफात येत होता, आज तो एक अभिनेता म्हणून आयफात सहभागी झाला आहे. तो केवळ सहभागीच झाला नाही, तो या महासोहळ्यात परफॉर्मन्सदेखील करणार आहे. शिवाय ‘आयफा-२०१७’मध्ये त्याला उत्कृष्ट अभिनयासाठी नामांकनही मिळाले आहे. 



आयफाविषयीच्या आठवणी सांगताना सुशांत सांगतो की, ‘आयफा-२०१७ मध्ये मला परफॉर्मन्स करण्याची संधी दिल्याबद्दल मी आयोजकांचा आभारी आहे. मात्र मी पहिल्यांदाच न्यू यॉर्कमध्ये परफॉर्मन्स करीत आहे, असे अजिबात नाही. यामागे एक मोठी स्टोरी आहे. जेव्हा मी इंजिनिअरिंगचे तिसरे वर्ष सोडून मुंबईकडे निघालो होतो, तेव्हा मी एक बॅकग्राउंड डान्सर म्हणून परफॉर्मन्स करीत होतो. आज पुन्हा एकदा मी आयफामध्ये परफॉर्मन्स करणार आहे. मात्र तेव्हाचा आणि आताच्या परफॉर्मन्समध्ये बराच फरक असेल, हे निश्चित. 

सुशांतने गेल्या काही वर्षांमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यामुळेच त्याला अमिताभ बच्चन आणि आमिर खान यांच्याबरोबर एका कॅटेगिरीत नॉमिनेशन मिळाले आहे. त्याकरिता हे नॉमिनेशन खूपच महत्त्वपूर्ण आहे.  


पुन्हा फुलणार का सलमान खान आणि कतरिना कैफची लव्हस्टोरी?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :