सनी लिओनीने पतीसोबतचा हा फोटो केला शेअर; यूजर्सनी म्हटले, ‘अश्लीलता नको पसरवू’!

बेबी डॉल सनी लिओनी सध्या तिच्या एका हॉट अ‍ॅण्ड बोल्ड फोटोमुळे ट्रोल होत आहे. यूजर्सनी तिच्या या फोटोला अत्यंत अश्लील स्वरूपाच्या कॉमेण्ट दिल्या आहेत.

सनी लिओनीने पतीसोबतचा हा फोटो केला शेअर; यूजर्सनी म्हटले, ‘अश्लीलता नको पसरवू’!
Published: 24 Feb 2018 09:06 PM  Updated: 24 Feb 2018 09:06 PM

आपल्या बोल्ड अ‍ॅण्ड हॉट अंदाजामुळे चाहत्यांना वेड लावणारी बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनी पुन्हा एकदा तिच्या हॉट फोटोवरून चर्चेत आहे. वास्तविक सनीला तिच्या या फोटोवरून ट्रोल केले जात आहे. बºयाचशा यूजर्सनी तर तिला या फोटोवरून अक्षरश: धारेवर धरले. अनेकांनी अश्लील कॉमेण्ट टाकताना सनीने अशाप्रकारची अश्लीलता पसरवू नये असे म्हटले आहे. 

सनीने काही वेळेपूर्वीच पती डेनियल वेबरसोबतचा एक फोटो तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला. फोटोमध्ये सनी खूपच हॉट अंदाजात बघावयास मिळत आहे. सनीचा हा फोटो प्रसिद्ध फोटोग्राफर डब्बू रत्नानीच्या कॅलेंडर शूट दरम्यानचा आहे. सनीने या फोटोत काळ्या रंगाचा अतिशय बोल्ड ड्रेस घातला असून, हातात मोप पकडलेला आहे. फोटो बघून लगेचच लक्षात येते की, सनी तिच्या फोटोशूटसाठी तयार होत आहे, तर फोटोमध्ये पती डेनियल सनीचे मदत करताना दिसत आहे. 
 

 

A post shared by Sunny Leone (@sunnyleone) on


सनीच्या या फोटोला आतापर्यंत कित्येक यूजर्सनी प्रचंड अश्लील अशा स्वरूपाच्या कॉमेण्ट दिल्या आहेत. काही यूजर्सनी सनी आणि तिच्या पतीवर निशाणा साधताना लिहिले की, ‘तू आणि तुझ्या पतीने आमच्या देशात अश्लीलता पसरविली आहे.’ दरम्यान, सनीला यापूर्वीदेखील अशा प्रसंगांचा सामना करावा लागला आहे. सनी लवकरच साउथ चित्रपटात बघावयास मिळणार आहे. ‘वीरमांदेवी’ असे तिच्या चित्रपटाचे नाव असून, तो तेलगू भाषेत आहे. चित्रपटाची पार्श्वभूमी ऐतिहासिक असून, यात सनी अतिशय डॅशिंग अंदाजात बघावयास मिळणार आहे. 


माधुरी दीक्षितचा बकेट लिस्ट बॉक्स ऑफिसवर हिट ठरेल का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :