​सूरज पांचोली रेमोच्या चित्रपटात करणार ‘लव्ह-अ‍ॅक्शन’!

सलमान खानच्या बॅनरखाली बनलेल्या ‘हिरो’मधून बॉलिवूड डेब्यू करणारा अभिनेता सूरज पांचोली पुन्हा एकदा नवी सुरुवात करू पाहतोय. यावेळी दिग्दर्शक रेमो डिसुजा याच्या चित्रपटात सूरज दिसणार आहे.

​सूरज पांचोली रेमोच्या चित्रपटात करणार ‘लव्ह-अ‍ॅक्शन’!
Published: 28 Mar 2017 01:59 PM  Updated: 28 Mar 2017 02:41 PM

सलमान खानच्या बॅनरखाली बनलेल्या ‘हिरो’मधून बॉलिवूड डेब्यू करणारा अभिनेता सूरज पांचोली पुन्हा एकदा नवी सुरुवात करू पाहतोय. यावेळी दिग्दर्शक रेमो डिसुजा याच्या चित्रपटात सूरज दिसणार आहे. सूरज लवकरच या चित्रपटाचे शूटींग सुुरू करणार आहे आणि एकदा का शूटींग सुुरू झाले की, ते २० ते २५ दिवसांत गुंडाळण्याचा त्याचा प्लान आहे. तसा दावाच त्याने केला आहे. सूरजचा हा चित्रपट एक लव्ह-अ‍ॅक्शन चित्रपट असणार आहे. यात सूरजसोबतच अजय देवगणचीही महत्त्वपूर्ण भूमिका आहे. हा चित्रपट दोन भावांची कथा आहे. म्हणजे अजय हा सूरजच्या मोठ्या भावाच्या रूपात चित्रपटात दिसणार आहे. खरे तर सलमानमुळेच हा चित्रपट सूरजला मिळाल्याचे बोलले जात आहे.  अर्थात यात तथ्य किती ते ठाऊक नाही.
 
ALSO READ : सूरज पांचोलीसाठी मिळता मिळेना ‘हिरोईन’!!

२०१५ मध्ये डेब्यूनंतर सूरजला एका चांगल्या स्क्रिप्टची प्रतीक्षा होती. मीडियाचे मानाल तर सूरज आणखी एका तेलगू हिट चित्रपटाच्या रिमेकचीही तयारी करतोय. याशिवाय रायटर आणि डायरेक्टर फारूख कबीर एक रोमॅन्टिक थ्रीलर घेऊन येणार आहेत. यातही सूरज दिसणार असल्याचे म्हटले जात आहे. हा चित्रपट सूरजचा २०१५ मध्ये आलेल्या ‘हिरो’चा सीक्वल असल्याचे बोलले जात आहे. या चित्रपटासाठी फारूख कबीर यांनी सूरजला लीड रोलमध्ये घेतले. अर्थात या चित्रपटाची हिरोईन अद्याप फायनल झालेली नाही.  आता हे चित्रपट सूरजच्या करिअरला किती गती देतात, ते बघणे इंटरेस्टिंग ठरणार आहे. ‘हिरो’मध्ये सूरजच्या सोबत आथिया शेट्टी दिसली होती. अर्थात हा चित्रपट बॉक्सआॅफिसवर दणकून आपटला होता.  

हाफ गर्लफ्रेंड हिंदी मीडियमवर भारी पडेल असे तुम्हाला वाटते का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :