‘हसिना’नंतर मोस्ट वॉण्टेड दाउद इब्राहिमचाही पहा फर्स्ट लुक!

​काही दिवसांपूर्वी अभिनेत्री श्रद्धा कपूर हिच्या आगामी ‘हसिना द क्वीन आॅफ मुंबई’ या चित्रपटातील श्रद्धाच्या हसिना पारकर लुकने सगळ्यांनाच धक्का दिला होता.

‘हसिना’नंतर मोस्ट वॉण्टेड दाउद इब्राहिमचाही पहा फर्स्ट लुक!
Published: 09 May 2017 07:37 PM  Updated: 09 May 2017 07:37 PM

काही दिवसांपूर्वी अभिनेत्री श्रद्धा कपूर हिच्या आगामी ‘हसिना द क्वीन आॅफ मुंबई’ या चित्रपटातील श्रद्धाच्या हसिना पारकर लुकने सगळ्यांनाच धक्का दिला होता. सोज्वळ दिसणाºया श्रद्धाच्या डॅशिंग लुकने सगळेच घायाळ झाले होते. आता असाच काहीसा डॅशिंग लुक रिल लाइफ अन् रिअल लाइफमधील तिच्या भावाचा अर्थात दाउद इब्राहिमचा रिलीज करण्यात आला आहे. पोस्टरमध्ये सिद्धांत खूपच डॅशिंग दिसत असून, श्रद्धाचा हसिना पारकर अन् सिद्धांतचा दाउद इब्राहिम लुक सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. 

सिद्धांत यापूर्वी ऐश्वर्या राय बच्चनसोबत ‘जज्बा’ या चित्रपटात झळकला होता. या भूमिकेसाठी त्याने खूपच मेहनत घेतल्याचे समजते. कारण त्याने दाउदच्या रूपात येण्यासाठी साधारणत: ९ ते १० किलो वजन वाढविले होते. पुढे ४० वर्ष वयाचा दिसण्यासाठी त्याने वजन कमीही केले होते. सिद्धांतच्या हे दाउद लुकमधील पोस्टर श्रद्धाने तिच्या ट्विटरवर शेअर केले असून, नेटिझन्सकडून त्यास चांगला प्रतिसाद मिळत आहे. 

सिद्धांतने एका वृत्तपत्राला माहिती देताना सांगितले होते की, काही सीन्ससाठी त्याला तोंडात सिलीकॉन ठेवावे लागले होते. ज्यामुळे त्याला बोलण्यास खूप अडचण येत होती. ‘हसिना द क्वीन आॅफ मुंबई’मध्ये श्रद्धाबरोबरची सिद्धांतची भूमिका खूपच सिरीयस आहे. चित्रपटात दोन्ही टाइम झोनला दाखविण्यात आले आहे. दाउद इब्राहिमचे तारुण्य अन् त्यानंतरचा त्याचा काळ. दोघेही बहीण-भाऊ पहिल्यांदाच या चित्रपटाच्या माध्यमातून एकत्र काम करीत आहेत. 

सिद्धांतने एका वृत्तपत्राला म्हटले होते की, श्रद्धासोबत काम करणे त्याच्यासाठी खूपच स्पेशल होते. चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान आम्ही खूप मस्ती केली. असे कधी वाटलेच नाही की, आम्ही चित्रपटाची शूटिंग करीत होतो. हा चित्रपट दाउदची बहीण हसिना पारकर हिच्या जीवनावर आधारित आहे. हसिना पारकर भारतात राहून दाउदचा कारभार कशा पद्धतीने सांभाळत असते, याविषयीची कथा चित्रपटात दाखविण्यात आली आहे.  दरम्यान, श्रद्धा तिच्या आगामी ‘हाफ गर्लफ्रेण्ड’ या चित्रपटाविषयी खूपच उत्साहित आहे. हा चित्रपट चेतन भगत याची ‘हाफ गर्लफेण्ड’ या कांदबरीवर आधारित आहे. हा चित्रपट १९ मे रोजी रिलीज होणार आहे. चित्रपटात श्रद्धासोबत अर्जुन कपूर मुख्य भूमिकेत आहे. 

हाफ गर्लफ्रेंड हिंदी मीडियमवर भारी पडेल असे तुम्हाला वाटते का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :