OMG!! ​‘पद्मावती’च्या ट्रेलर रिलीजनंतर नाराज तर नाही शाहिद कपूर ?

आतापर्यंत ‘पद्मावती’चा ट्रेलर २ कोटींवर युजर्सनी पाहिला. पण याच ट्रेलरमुळे शाहिद कपूर कदाचित दुखावला आहे. होय, शाहिदने इन्स्टाग्रमावर लिहिलेली ताजी पोस्ट पाहून तरी तसेच वाटतेय.

OMG!! ​‘पद्मावती’च्या ट्रेलर रिलीजनंतर नाराज तर नाही शाहिद कपूर ?
Published: 11 Oct 2017 01:55 PM  Updated: 11 Oct 2017 01:59 PM

संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘पद्मावती’चा बहुप्रतिक्षीत चित्रपटाचा ट्रेलर दोन दिवसांपूर्वी रिलीज झाला अन् प्रेक्षक भारावून गेलेत. काही तासात कोट्यवधी लोकांनी हा ट्रेलर बघितला. उण्यापु-या चार तासांत ‘पद्मावती’च्या ट्रेलरला विक्रमी व्ह्यूज मिळालेत.  यानंतर पहिल्या २४ तासांत या चित्रपटाने १.५ कोटी व्ह्यूज मिळवले. युट्यूबवर आतापर्यंत ‘पद्मावती’चा ट्रेलर २ कोटींवर युजर्सनी पाहिला. पण याच ट्रेलरमुळे शाहिद कपूर कदाचित दुखावला आहे. होय, शाहिदने इन्स्टाग्रमावर लिहिलेली ताजी पोस्ट पाहून तरी तसेच वाटतेय.
‘पद्मावती’च्या ट्रेलरमध्ये शाहिद कपूरने साकारलेला राजा रावल रतन सिंग, दीपिका पादुकोणने साकारलेली राणी पद्मावती आणि रणवीर सिंगने साकारलेला अलाऊद्दीन खिल्जी सगळेच प्रेक्षकांना मोहित करून गेले. पण त्यातही या सगळ्यांत भाव खावून गेला तो रणवीर सिंग. खरे तर ‘पद्मावती’च्या तीन मिनिटांच्या या ट्रेलरमध्ये रणवीरच्या तोंडी एकही संवाद नाही. पण तरिही त्याचा दमदार अभिनयच सगळ्यांना वेड लावून गेला. नेमकी हीच बाब शाहिदला खटकल्याचे दिसतेय. रणवीरने सगळा भाव खावून जावे, हे कदाचित शाहिदला पचलेले दिसत नाही. त्याचमुळे एकीकडे रणवीर ट्रेलरला मिळालेला प्रतिसाद पाहून भावूक झालेला दिसला तर शाहिदने गर्भित पोस्ट टाकून सगळ्यांना अवाक् केले.
 

 

Still waters run deep. He will rise on the 1st of December. Wait for it. #rajputpride

A post shared by Shahid Kapoor (@shahidkapoor) on
ALSO READ : Watch : ​केवळ अप्रतिम! चुकूनही पाहायला विसरू नये, असा ‘पद्मावती’चा शानदार ट्रेलर रिलीज!!

‘Still waters run deep. He will rise on the 1st of December. Wait for it. #rajputpride’ , असे शाहिदने लिहिले.  रणवीरच्या अलाऊद्दीन खिल्जीपुढे शाहिदने साकारलेला महाराजा रावल रतन सिंग झाकोळला गेला, ही नाराजीच कदाचित शाहिदच्या या पोस्टमधून बाहेर पडलीय.
शाहिद म्हणतोय त्याप्रमाणे राजा रावल सिंग याचा राजपुती बाणा पाहण्यासाठी आपल्याला १ डिसेंबरची वाट प्रतीक्षा करावी लागणार आहे. म्हणजेच ‘पद्मावती’च्या रिलीजची प्रतीक्षा करावी लागणार आहे. आता रिलीजनंतर  शाहिद जिंकतो की रणवीर, हे कळेलच. पण तूर्तास तर रणवीर हाच सरस दिसतोय. शाहिदने मोठ्या मनाने हे मान्य करायलाच हवे. याबद्दल तुम्हाला काय वाटते, ते कळावायला विसरू नका.


नाना पाटेकरचा आपला मानूस हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरेल?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :