View Pics : परिवारासमवेत इटली येथे व्हेकेशन एन्जॉय करतोय संजय दत्त!

​काम आणि परिवार यांच्यात ताळमेळ बसविण्याची कला अभिनेता संजय दत्त याच्याकडून खरोखरच शिकण्यासारखी आहे.

View Pics : परिवारासमवेत इटली येथे व्हेकेशन एन्जॉय करतोय संजय दत्त!
Published: 17 Jun 2017 03:37 PM  Updated: 17 Jun 2017 03:37 PM

काम आणि परिवार यांच्यात ताळमेळ बसविण्याची कला अभिनेता संजय दत्त याच्याकडून खरोखरच शिकण्यासारखी आहे. कारण कितीही बिझी शेड्यूल्ड असले तरी संजूबाबा आपल्या परिवारासाठी वेळ काढतोच. त्यातच थोडा जरी अधिकचा अवधी मिळाला की, तो थेट आपल्या परिवारासमवेत सातासमुद्रापार जातो. सध्या संजूबाबा आपल्या परिवारासाठी अधिकाधिक वेळ देत आहे. तो पत्नी मान्यता आणि दोन मुले शाहरान आणि इक्रा यांच्यासोबत इटली येथे पोहोचला असून, त्या ठिकाणी व्हेकेशन एन्जॉय करीत आहे. मान्यताने याबाबतचे काही फोटोज् सोशल मीडियावर शेअर केले असून, त्यामध्ये मुलांसोबत एन्जॉय करताना दिसून येत आहे. 









मान्यताने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर परिवारासमवेतचे काही फोटोज् पोस्ट केले आहेत. बºयाचशा फोटोंमध्ये मान्यता आपल्या मुलांसमवेत मस्तीच्या मूडमध्ये बघावयास मिळत आहे. त्यात ती खूपच सुंदर दिसत असून, चेहºयावर तिचा आनंद झळकत आहे. वास्तविक तिने शेअर केलेल्या एकाही फोटोमध्ये संजूबाबा दिसत नाही. परंतु तो त्यांच्यासोबतच इटलीत आहे. 









असो, संजूबाबाच्या आगामी प्रोजेक्टविषयी सांगायचे झाल्यास लवकरच तो ‘भूमी’ या चित्रपटात झळकणार आहे. त्याचबरोबर तो आरंभ सिंग यांच्या आगामी ‘मलंग’मध्येही बघावयास मिळणार आहे. या चित्रपटात संजय दत्तच्या अपोझिट ऐश्वर्या राय-बच्चन असणार आहे. मात्र ऐश्वर्याने अद्यापपर्यंत चित्रपटासाठी होकार दिला नसल्याने तिच्या भूमिकेविषयी अजूनही स्पष्टता झालेली नाही. वृत्तानुसार ऐश्वर्याशी निर्माते अ‍ॅप्रोच झाले असून, लवकरच ते याबाबतचे त्यांच्याकडून स्पष्टीकरण दिले जाण्याची शक्यता आहे. 


पुन्हा फुलणार का सलमान खान आणि कतरिना कैफची लव्हस्टोरी?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :