Viral : लाल रंगाच्या बिकिनीत सलमान खानच्या या विदेशी अभिनेत्रीने लावली आग!

​बॉलिवूडमध्ये सलमान खान ‘भाईजान’ या नावाबरोबरच ‘गॉडफादर’ या नावानेही प्रसिद्ध आहे. त्याच्यासोबत जो कोणी कलाकार झळकतो, त्याला पुढील करिअर करण्यास फारशा अडचणी येत नाहीत.

Viral : लाल रंगाच्या बिकिनीत सलमान खानच्या या विदेशी अभिनेत्रीने लावली आग!
Published: 15 Jun 2017 07:15 PM  Updated: 15 Jun 2017 07:15 PM

बॉलिवूडमध्ये सलमान खान ‘भाईजान’ या नावाबरोबरच ‘गॉडफादर’ या नावानेही प्रसिद्ध आहे. त्याच्यासोबत जो कोणी कलाकार झळकतो, त्याला पुढील करिअर करण्यास फारशा अडचणी येत नाहीत. आतापर्यंत सलमानने कित्येक अभिनेते-अभिनेत्रींचे करिअर घडविले आहे. आता सलमान त्याच्या आगामी ‘ट्यूबलाइट’ या चित्रपटातून अशाच एका विदेशी अभिनेत्रीला बॉलिवूडचे दरवाजे उघडे करून देत आहे. जू जू नावाची ही चायनीज अभिनेत्री ‘ट्यूबलाइट’मध्ये महत्त्वपूर्ण भूमिकेत बघावयास मिळणार असल्याने सध्या ती भारतीय प्रेक्षकांमध्ये चर्चेत आहे. आतापर्यंत तिची ट्रेलर आणि पोस्टरमधून झलक बघावयास मिळाली आहे. परंतु वास्तविक जीवनात जू जू खूपच मॉडर्न असून, तिचा एक लाल रंगाच्या बिकिनीतील फोटो सध्या सोशल मीडियावर धूम उडवून देत आहे. 

सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या जगभरातील चाहत्यांच्या संपर्कात राहणाºया जू जूचा एक लाल रंगाच्या बिकिनीतील फोटो सध्या चर्चेत आहे. हा फोटो तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला असून, त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘नीट अ हॉलिडे!’ जू जूच्या या कॅप्शनवरून सध्या एक अंदाज वर्तविला जात आहे. तो म्हणजे ती लवकरच हॉलिडे एन्जॉय करण्यासाठी भारतात येऊ शकते. वास्तविक ‘ट्यूबलाइट’चे दिग्दर्शक कबीर खान यांनी याअगोदर जू जू चित्रपटाच्या प्रमोशनसाठी भारतात येणार असल्याचे स्पष्ट केले होते. त्यामुळे तिने शेअर केलेला हा फोटो अन् त्याचे कॅप्शन तिच्या भारतीय दौºयाचे संकेत देत आहे. 
 

 

A post shared by Zhu Zhu (@zhuzhuclubheaven) on


वास्तविक जू जू सोशल मीडियावर जबरदस्त अ‍ॅक्टिव आहे. ती नेहमीच तिचे फोटोज शेअर करीत असते. आगामी ‘ट्यूबलाइट’मध्ये ती सलमान खानची अभिनेत्री असेल. त्यामुळे चित्रपटात दोघांची जबरदस्त केमिस्ट्री बघावयास मिळू शकते. काही दिवसांपूर्वीच कबीर खान यांनी ‘ट्यूबलाइट’ हा ‘लिटिल बॉय’ या हॉलिवूड चित्रपटाशी इन्स्पायर आहे. चित्रपटात सलमानची भूमिका अशा व्यक्तीची आहे, ज्याला कुठलीही गोष्ट समजून घेण्यास खूप वेळ लागतो. आतापर्यंत चित्रपटाची तीन गाणी आणि ट्रेलर रिलीज करण्यात आला असून, त्यास प्रेक्षकांनी चांगलाच प्रतिसाद दिला आहे. 

हा चित्रपट १९६२ मध्ये झालेल्या भारत-चीन युद्धावर आधारित आहे. चित्रपटात सलमानचा लहान भाऊ सोहेल खान याचीदेखील प्रमुख भूमिका आहे. हा चित्रपट ईदला रिलीज होणार आहे. सध्या सलमान खान या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असून, बॉक्स आॅफिसवर चित्रपट चांगला गल्ला जमविण्यात यशस्वी होईल, असेच काहीसे चित्र दिसत आहे. 


मराठी बिग बॉस हिट ठरणार का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :