IIFA 2017 : ‘चलती हैं क्या’वर सलमान खान अन् वरुण धवनने धरला ठेका!!

​न्यू यॉर्क येथे आयोजित केलेल्या १८व्या ‘आयफा-२०१७’ सोहळ्यात सर्वाधिक प्रतीक्षा लागून असलेल्या दबंग सलमान खानच्या परफॉर्मन्सनी सोहळ्यात अशी काही रंगत आणली की, उपस्थित दंग राहिले.

IIFA 2017 : ‘चलती हैं क्या’वर सलमान खान अन् वरुण धवनने धरला ठेका!!
Published: 16 Jul 2017 08:54 PM  Updated: 16 Jul 2017 08:54 PM

न्यू यॉर्क येथे आयोजित केलेल्या १८व्या ‘आयफा-२०१७’ सोहळ्यात सर्वाधिक प्रतीक्षा लागून असलेल्या दबंग सलमान खानच्या परफॉर्मन्सनी सोहळ्यात अशी काही रंगत आणली की, उपस्थित दंग राहिले. सलमानने त्याच्या गाण्यांवर निव्वळ परफॉर्मन्सच केला नाही तर, प्रेक्षकांनाही थिरकायला भाग पाडले. मात्र रंगत तर तेव्हा आली जेव्हा ‘चलती हैं क्या...’ या गाण्यावर सलमानबरोबर वरुण धवननेही ठेका धरला. 

सलमानने आयफाच्या पहिल्याच दिवशी स्पष्ट केले होते की, मी पुरस्कारासाठी सोहळ्यांमध्ये हजेरी लावत नाही, तर परफॉर्मन्सचा आनंद घेण्यासाठी मी सोहळ्यांमध्ये हजेरी लावतो. सलमानच्या या वक्तव्यानंतर सगळ्यांच्याच नजरा त्याच्या परफॉर्मन्सवर होत्या. त्यानेही उपस्थितांना नाराज न करता तशाच प्रकारचा धमाकेदार परफॉर्मन्स केला. सलमानच्या एंट्रीपासून ते अखेरच्या क्षणापर्यंत उपस्थितांमध्ये जोश होता. अर्थात हा जोश सलमाननीच भरला होता. मात्र खरा जल्लोष तेव्हा झाला जेव्हा सलमानबरोबर वरुणनेही ठेका धरला. 



वास्तविक ‘चलती हैं क्या...’ हे गाणे सलमान खान याच्या ‘जुडवा’ या चित्रपटातील आहे. सध्या या चित्रपटाच्या सीक्वलची म्हणजेच ‘जुडवा-२’ची शूटिंग सुरू असून, चित्रपटात सलमानच्या जागी वरुण धवन दिसणार आहे. त्यामुळे या गाण्याशी वरुणचेही नाते जुडलेले असल्याने त्यानेही सलमानबरोबर या गाण्यावर धमाकेदार डान्स केला. सलमानविषयी सांगायचे झाल्यास, तो पहिल्या दिवसापासून आयफाविषयी उत्सुक असल्याचे दिसून आले. 

जेव्हा तारे-तारकांनी ग्रिन कार्पेटवर हजेरी लावली, त्याच दिवशी वरुण राजाचे आगमन झाल्याने सोहळ्यात व्यत्यय येईल अशी चर्चा केली जात होती, परंतु सलमानने ट्विट करून पावसात नाचण्याचा आनंद वेगळाच असेल असे म्हणत ‘शो मस्त गो आॅन’ असे दाखवून दिले. सलमानचा हा उत्साह इतर कलाकारांमध्येही जोश भरणारा होता. ठरल्याप्रमाणे सलमानचा परफॉर्मन्स खूपच दर्जेदार झाला. 


पुन्हा फुलणार का सलमान खान आणि कतरिना कैफची लव्हस्टोरी?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :