सलमान खानचा हा फोटो का होत असेल व्हायरल? जाणून घ्या!

‘टायगर जिंदा हैं’च्या सेटवरील सलमानने एक फोटो शेअर केला असून, सोशल मीडियावर हा फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

सलमान खानचा हा फोटो का होत असेल व्हायरल? जाणून घ्या!
Published: 12 Sep 2017 05:04 PM  Updated: 12 Sep 2017 05:04 PM

सुपरस्टार सलमान खान सध्या त्याच्या आगामी ‘टायगर जिंदा हैं’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. शूटिंगच्या सुरुवातीपासूनच सलमान आणि कॅटरिना कैफचे सेटवरील फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले जात आहेत. परंतु आता पोस्ट केलेला एक फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. हा फोटो स्वत: सलमान खानने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केला आहे. हा फोटोदेखील सेटवरील असून, फोटोमध्ये सलमानसोबत एक व्यक्ती उभा असल्याचे दिसत आहे. त्या व्यक्तीचा पोशाख पाहता फोटो अबूधाबी येथे क्लिक करण्यात आल्याचे स्पष्ट होते. 

या व्यक्तीचे नाव अब्दुल्ला अलहमद असे असून, त्याची चित्रपटात भूमिका आहे की नाही हे मात्र अद्यापपर्यंत स्पष्ट होऊ शकले नाही. हा फोटो चित्रपटाच्या अ‍ॅक्शन सीन्सदरम्यानचा असावा. कारण फोटोमध्ये दिसत असलेल्या सलमानच्या कपाळावर रक्त (मेकअप) दिसत आहे. शिवाय त्याचे कपडेही फाटलेले आहेत. तसेच त्याच्या पाठीमागे एक ट्रॉलीही उलटलेली दिसत आहे. सलमान ‘टायगर जिंदा हैं’नंतर पहिल्यांदाच कॅटरिना कैफसोबत या चित्रपटात काम करीत आहे. हा चित्रपटदेखील एक अ‍ॅक्शन थ्रिलर असून, पहिल्या भागाच्या तुलनेत यामध्ये तुफान अ‍ॅक्शन बघावयास मिळणार आहे. 
 

 

A post shared by SALMAN KHAN (@beingsalmankhanteam) on


हा चित्रपट सलमान खानच्याच २०१२ मध्ये आलेल्या ‘एक था टायगर’चा दुसरा भाग आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अब्बास जफर करीत आहेत. तर पहिल्या भागाचे दिग्दर्शन कबीर खान यांनी केले होते. काही दिवसांपूर्वीच सलमान खानचा ‘ट्यूबलाइट’ हा चित्रपट रिलीज झाला होता. मात्र या चित्रपटाने बॉक्स आॅफिसवर फारसा करिष्मा केला नव्हता. त्यामुळे सलमानला या चित्रपटाकडून प्रचंड अपेक्षा आहेत. दरम्यान ‘ट्यूबलाइट’साठी सलमानने खूप वजन वाढविले होते. परंतु ‘टायगर जिंदा हैं’च्या सेटवरून आतापर्यंत जेवढे फोटोज् समोर आलेले आहेत त्यामध्ये सलमान खानचा फिजिकली अंदाज खूपच दमदार दिसत आहे. 

असो, आता पुन्हा फोटोविषयी सांगायचे झाल्यास, याचा चित्रपट उलगडा रिलीजनंतरच होऊ शकतो. जर या फोटोमधील व्यक्तीचा चित्रपटाशी काहीही संबंध नसेल तर तो सलमानचा चाहता असू शकतो. कारण सलमान नेहमीच त्याच्या चाहत्यांच्या क्लोज राहणे पसंत करतो. अशात एखाद्या चाहत्याने त्याच्यासोबत काढलेला फोटो त्याने शेअर केला असावा, असा अंदाज लावल्यास चुकीचे ठरू नये. 


कंगना राणौतचा सिमरन हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरेल का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :