​Mil jao yaaron!! कपिल शर्मा-सुनील ग्रोव्हरच्या वादात ऋषी कपूर यांची मध्यस्थी!

कॉमेडी किंग कपिल शर्मा आणि सुनील ग्रोव्हर यांच्यातील वादात अनेकांनी मध्यस्थी करण्याचे प्रयत्न केलेत. पण सगळ्यांनाच अपयश आले. आता आपल्या परखड स्वभावासाठी ओळखले जाणारे ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांनी वादात मध्यस्थी केली आहे.

​Mil jao yaaron!! कपिल शर्मा-सुनील ग्रोव्हरच्या वादात ऋषी कपूर यांची मध्यस्थी!
Published: 18 Apr 2017 01:19 PM  Updated: 18 Apr 2017 01:20 PM

कॉमेडी किंग कपिल शर्मा आणि सुनील ग्रोव्हर यांच्यातील वादात अनेकांनी मध्यस्थी करण्याचे प्रयत्न केलेत. पण सगळ्यांनाच अपयश आले. आता आपल्या परखड स्वभावासाठी ओळखले जाणारे ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांनी वादात मध्यस्थी केली आहे. होय, झाले गेले विसरून जा आणि पुन्हा एकत्र या, असे आवाहन त्यांनी कपिल व सुनील यांना केले आहे. ‘आयपीएल संघ सनरायझर्स हैदराबादमध्ये कपिल शमार्सारखा दिसणारा खेळाडू आहे. कोणी सुनील ग्रोव्हरला एखाद्या संघात पाहिले का ? एकत्र या मित्रांनो !’, असे अतिशय भावूक शब्दांतील tweet ऋषी कपूर यांनी केले आहे.
ऋषी कपूर यांची ही मध्यस्थी किती यशस्वी होते, हे पाहण्यास आतूर असताना सुनीलने मात्र पुन्हा एकदा ‘नो पॅचअप’चा सूर आवळला आहे. सुनील अद्यापही पॅचअपच्या मूडमध्ये नाहीय. ‘सर मी रिटायर्ड हर्ट असल्याने या सत्रात खेळत नाहीय,’ अशा शब्दांत सुनीलने ऋषी यांच्या टिष्ट्वटला उत्तर दिले आहे. एकंदर काय तर, कपिल शर्मासोबत काम करण्यास आता आपल्याला जराही इंटरेस्ट राहिला नसल्याचेच जणू, सुनीलने स्पष्ट केले आहे.   
ऋषी कपूर यांनी आपल्या ‘खुल्लम खुल्ला’ या आत्मचरित्राच्या प्रमोशनसाठी कपिल शर्माच्या शोमध्ये हजेरी लावली होती. यावेळी कार्यक्रमात पत्नी नितू सिंगदेखील उपस्थित होत्या.  
 आॅस्ट्रेलियातील सिडनी आणि मेलबर्नमधील शो संपवून मुंबईत परत येत असताना  कपिलने त्याच्या शोमध्ये डॉ. गुलाटी आणि रिंकू भाभीची भूमिका साकाणा-या सुनील ग्रोव्हरला  मारहाण केली होती. तू माझा नोकर आहेत. तुझा शो फ्लॉप आहे, तू फ्लॉप आहे, असे काय काय ते कपिल दारूच्या नशेत सुनीलला बोलून गेला होता. यामुळे सुनील कमालीचा दुखावला गेला आहे. 


मराठी बिग बॉस हिट ठरणार का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :