ना छलके जाम...जश्न कमाल! अशी रंगली ‘रईस’ची सक्सेस पार्टी!!

बॉक्स आॅफिसवर शानदार प्रदर्शन करणाºया ‘रईस’च्या टीमने सोमवारी रात्री सक्सेस पार्टी साजरी केली आणि तेही मद्याविना. ‘रईस’ किंगखान शाहरूख खान याच्यासह सनी लिओनी, नवाजुद्दीन सिद्दीकी या पार्टीत प्रामुख्याने हजर होते.

ना छलके जाम...जश्न कमाल! अशी रंगली ‘रईस’ची सक्सेस पार्टी!!
Published: 31 Jan 2017 11:34 AM  Updated: 31 Jan 2017 11:36 AM

बॉक्स आॅफिसवर शानदार प्रदर्शन करणाºया ‘रईस’च्या टीमने सोमवारी रात्री सक्सेस पार्टी साजरी केली आणि तेही मद्याविना. ‘रईस’ किंगखान शाहरूख खान याच्यासह सनी लिओनी, नवाजुद्दीन सिद्दीकी या पार्टीत प्रामुख्याने हजर होते. शाहरूख व नवाज पार्टीत एका आगळ्या वेगळ्या अंदाजात दिसले. या दोघांनीही अगदी सारखी टी-शर्ट कॅरी केली होती. शाहरूखच्या टी-शर्टवर लिहिले होते, ‘शेरों का जमाना होता है’ आणि नवाजुद्दीनच्या टी-शर्टवर लिहिलेले होते ‘अपना टाईम शुरू.’ मुंबई्च्या एका पंचतारांकित हॉटेलात ‘रईस’च्या संपूर्ण टीमने सक्सेस पार्टी साजरी केली.  या सक्सेस पार्टीतील संपूर्ण टीमचा उत्साह बघण्यासारखा होता.‘रईस’ची संपूर्ण स्टारकास्ट एका खुल्या जीपमधून आली आणि मग पार्टी रंगली.







‘रईस’चे दिग्दर्शक राहुल ढोलकिया यावेळी प्रचंड आनंदात दिसले. शाहरूख सामान्यत: असा चित्रपट करत नाही. पण ‘रईस’साठी शाहरूखने होकार दिला. केवळ होकारच नाही तर त्याने व नवाजुद्दीनने आपल्या भूमिका जिवंत केल्यात.





या पार्टीत ‘जश्न’ होणार पण ‘जाम’ नसणार, असा दावा ‘रईस’च्या टीमने केला होता आणि नेमके झालेही असेच. पार्टीत प्रचंड धम्माल झाली. पण मद्याशिवाय. राहुल ढोलकिया दिग्दर्शित ‘रईस’ची बॉक्सआॅफिसवर यशस्वी वाटचाल सुरु आहे. ‘रईस’ हा या वर्षांतील १०० कोटी क्लबमध्ये सामील होणारा पहिला सिनेमा ठरला आहे. केवळ भारतातच नाही तर भारताबाहेरही ‘रईस’ने चांगली कमाई केली आहे.‘रईस’ गत २५ जानेवारीला रिलीज झाला. याच दिवशी हृतिक रोशनचा ‘काबील’ही रिलीज झाला. त्यामुळे बॉक्सआॅफिसवर ‘रईस’ विरूद्ध ‘काबील’ असा संघर्ष रंगला. अखेर ‘रईस’ने या संघर्षात बाजी मारली, असेच म्हणावे लागेल.
 
ALSO READ : ​‘रईस’ची गँग सक्सेस पार्टीत पाळणार ‘ड्राय डे’!
Raees रिलिज झाल्यानंतर महिरा खान झाली नाराज?


दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगच्या नात्यात दुरावा आला आहे असे तुम्हाला वाटतंय का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :