‘या’ सुपरस्टारच्या पोस्टरला जोड्याने मारणाºया तरुणाची चाहत्यांनी केली धुलाई, व्हिडीओ व्हायरल!

साउथ सुपरस्टार पवन कल्याणच्या पोस्टर्सला एक तरुण जोड्याने मारत असल्याचा व्हिडीओ समोर आल्यानंतर त्याच्या चाहत्यांनी त्या तरुणाची जबरदस्त धुलाई केली.

‘या’ सुपरस्टारच्या पोस्टरला जोड्याने मारणाºया तरुणाची चाहत्यांनी केली धुलाई, व्हिडीओ व्हायरल!
Published: 19 Jan 2018 09:43 PM  Updated: 19 Jan 2018 09:43 PM

असे म्हटले जाते की, साउथ इंडियन चित्रपटांमधील स्टार्सची फॅन फॉलोइंग कमालीची असते. कारण या फॅन्सच्या मनात त्यांच्या स्टार्सबद्दल एवढा आदर असतो की, ते त्याला देवासमान समजतात. त्यामुळेच साउथमधील बरेचसे असे स्टार्स आहेत, ज्यांचे मंदिरे बांधण्यात आली आहेत. तेलगू अभिनेता पवन कल्याण हे त्यातीलच एक नाव असून, त्याच्याप्रती चाहते प्रचंड संवेदनशील आहेत. याचा प्रत्यय नुकताच एका व्हिडीओच्या माध्यमातून बघावयास मिळाला. सध्या पवन कल्याणचा एक व्हिडीओ इंटरनेटवर तुफान व्हायरल होत असून, त्यामध्ये एक तरुण पवन कल्याणच्या पोस्टर्सला जोड्याने मारताना अन् पोस्टर्सवर थुंकताना दिसत आहे. व्हिडीओ थोडा पुढे गेल्यानंतर हाच तरुण अंडरवियरवर जमिनीवर बसलेला दिसत असून, हात जोडून माफी मागताना दिसत आहे. या तरुणाच्या अवतीभोवती पवन कल्याणचे बरेचसे चाहते दिसत असून, त्याची लाथाबुक्यांनी धुलाई करताना दिसत आहे. 

हा व्हिडीओ वॅरिफाइड ट्विटर हॅण्डल तेलगू ३६० वरून शेअर करण्यात आला असून, त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, पवनच्या चाहत्यांचा व्हिडीओ. ज्यामध्ये चाहते एका तरुणाची जबरदस्त धुलाई करीत आहेत. वास्तविक ज्या तरुणाला मारहाण करण्यात आली, तो निर्दोष नाही. कारण त्याने अगोदर पवनच्या पोस्टरला जोड्याने मारले. याच चुकीमुळे चाहत्यांनी त्याची धुलाई केली. 
 


पवनच्या चाहत्यांनी हा व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल केला आहे. जेणेकरून अधिकाधिक लोकांपर्यंत हा संदेश पोहोचू शकेल की, जो कोणी पवनबद्दल असे करेल त्याला अशाच प्रकारची शिक्षा दिली जाईल. दरम्यान, हा व्हिडीओ अपलोड झाल्यानंतर यूजर्समध्ये प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. बºयाच यूजर्सनी म्हटले की, त्या तरुणाने केलेले कृत्य चुकीचे होते. परंतु त्याला अशाप्रकारची शिक्षा देणेही चुकीचे आहे. 


नाना पाटेकरचा आपला मानूस हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरेल?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :