चाहत्याने काढली या अभिनेत्रीची छेड; सेल्फी घेण्याच्या बहाण्याने ठेवला कमरेवर हात !

ही अभिनेत्री जेव्हा एका इव्हेंटमध्ये सहभागी झाली होती, तेव्हा एका चाहत्याने तिच्याशी छेडछाड करण्याचा प्रयत्न केला. यामुळे तिला चांगलाच धक्का बसला.

चाहत्याने काढली या अभिनेत्रीची छेड; सेल्फी घेण्याच्या बहाण्याने ठेवला कमरेवर हात !
Published: 13 Jun 2018 08:50 PM  Updated: 13 Jun 2018 08:57 PM

‘प्यार का पंचनामा’, ‘आकाशवाणी’ आणि ‘सोनू के टीटू की स्वीटी’ यासारख्या चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची चुणूक दाखविणारी अभिनेत्री नुसरत भरूचा हिच्याशी छेडछाड केल्याचा प्रकार समोर आला आहे. त्याचे झाले असे की, नुसरत पुणे येथे आयोजित केलेल्या एका इव्हेंटमध्ये सहभागी झाली होती. याच ठिकाणी एका चाहत्यांनी तिचे छेड काढली. 

नुसरत ज्या इव्हेंटमध्ये पोहोचली होती, त्याठिकाणी तिच्या चाहत्यांनी एकच गर्दी केली होती. यातीलच एकाने तिच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी तिला रिक्वेस्ट केली. जेव्हा नुसरत त्याच्यासोबत फोटो क्लिक करीत होती, तेव्हा तो तिच्या खूपच जवळ आला. तो इथवरच थांबला नाही तर त्याने नुसरतच्या चक्क कमरेवर हात ठेवला. तसेच तिला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. चाहत्याच्या या प्रकारामुळे नुसरतला धक्काच बसला. ही बाब जेव्हा तिच्या टीम मेंबरच्या लक्षात आली तेव्हा त्याने लगेचच तिची मदत केली. 

टीम मेंबर्सनी केवळ त्या चाहत्याला फटकारलेच नाही तर, त्याला नुसरतपासून दूर राहण्याचा रितसर सल्लाही दिला. छेडछाडीनंतर नुसरतने सांगितले की, मी माझ्या सुरक्षेची जबाबदारी इव्हेंट आयोजकांवर सोपवित असते. बºयाचदा लोक माझ्याकडे सेल्फी क्लिक करण्यासाठी रिक्वेस्ट करीत असतात; परंतु यावेळेस जे घडले ते खरोखरच धक्कादायक होते. 

एक मुलगा माझ्याकडे फोटो क्लिक करण्यासाठी आला होता. मला याबाबतची अजिबातच जाणीव नव्हती की, त्याचा यामागचा नेमका हेतू काय होता. मी त्याला काही अंतरापर्यंत जवळ येऊ दिले; परंतु तो इतक्या जवळ आला की, त्याने माझ्या कमरेवर हात ठेवला. त्याचे हे कृत्य बघून मला धक्काच बसला; परंतु काही रिअ‍ॅक्ट झाले नाही. सुदैवाने माझा मेकअप आर्टिस्ट माझ्यासोबत होता. त्याच्या मदतीने मी त्याला बाजूला सारले. मी कधीच माझ्या फ्रेंडली स्वभावामुळे लोकांचे नेचर समजू शकत नाही. 


माधुरी दीक्षितचा बकेट लिस्ट बॉक्स ऑफिसवर हिट ठरेल का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :