SEE PICS : सौंदर्यात कॅटरिना कैफलाही धोबीपछाड देईल तिची धाकटी बहीण इसाबेल!

​बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री कॅटरिना कैफ तिच्या आगामी ‘जग्गा जासूस’ या चित्रपटामुळे चांगलीच चर्चेत आहे.

SEE PICS : सौंदर्यात कॅटरिना कैफलाही धोबीपछाड देईल तिची धाकटी बहीण इसाबेल!
Published: 15 Jun 2017 10:33 PM  Updated: 15 Jun 2017 10:36 PM

बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री कॅटरिना कैफ तिच्या आगामी ‘जग्गा जासूस’ या चित्रपटामुळे चांगलीच चर्चेत आहे. एक्स बॉयफ्रेंड रणबीर कपूरसोबत झालेले ब्रेकअप विसरून ती या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करीत आहे. विशेष म्हणजे प्रमोशनदरम्यान रणबीरसोबतच्या काही क्षणाचे व्हिडीओ आणि फोटोही ती तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर करीत आहे. या फोटोंमध्ये तिने काही दिवसांपूर्वी बहीण इसाबेल हिच्यासोबतचाही एक फोटो शेअर केला असल्याने, नेटकºयांमध्ये रणबीर-कॅटच्या फोटोंपेक्षा बहीण इसाबेलच्या फोटोवरच अधिक चर्चा रंगविली जात आहे.









वास्तविक कॅटचे बहीण इसाबेल हिचे सौंदर्य वेड लावणारे असून, सुंदरतेच्या बाबतीत ती कॅटलाही धोबीपछाड देईल अशाच काहीशा प्रतिक्रिया समोर येत आहेत. वास्तविक इसाबेल कॅटपेक्षाही अधिक नेटसॅव्ही आहे. ती नेहमीच तिचे फोटो इन्स्टावर अपलोड करीत असते. तिचे फॉलोअर्सही मोठ्या प्रमाणात असल्याने तिच्या प्रत्येक फोटोंवर कौतुकाचा वर्षावच केला जातो. इसाबेलचे असेच काहीसे फोटो आम्ही तुम्हाला दाखविणार आहोत. 








कॅटची बहीण असलेल्या इसाबेलला मॉडेलिंगबरोबरच अभिनयातही रस आहे. सध्या बॉलिवूडमध्ये एंट्री करण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यासाठी सलमान खानच प्रयत्न करीत असल्याची माहिती समोर येत आहे. कॅटरिनालादेखील सलमानेच बॉलिवूडमध्ये लॉन्च केले आहे. आता इसाबेललाही लॉन्च करण्याची तयारी केली जात आहे. वृत्तानुसार ३१ वर्षीय इसाबेल एका कॅनेडियन चित्रपटात झळकणार असून, हा चित्रपट सलमान खान प्रोड्यूस करीत आहे. 









इसाबेलच्या अभिनयाच्या तयारीविषयी सांगायचे झाल्यास, तिने मॉडेलिंगला सुरुवात केली असून, अनेक शोजमध्ये तिने सहभाग घेतला आहे. शिवाय तिला बहीण कॅटरिनाच्या पावलावर पाऊल ठेवण्याची इच्छा असून, त्यादृष्टीने तिची तयारी सुरू आहे. त्याकरिता तिने सोशल मीडियाचा आधार घेतला असून, आपल्या सौंदर्याने ती याठिकाणी आग लावताना दिसत आहे. 





त्याचबरोबर इसाबेलने अनेक जाहिरातींमध्येही काम केले आहे. स्क्रीनवर इसाबेलचा वावर खूपच आकर्षित करणारा असून, कॅटलाही तिचे सौंदर्य धोबीपछाड देईल असेच काहीसे दिसून येते. आता इसाबेलने लवकरच बॉलिवूडमध्ये एंट्री करावी अशी तिच्या भारतीय फॅन्सची इच्छा असेल, यात शंका नाही. 


दिव्यांका त्रिपाठी आणि विवेक दहिया नच बलियेचे विजेते ठरतील का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :