IIFA 2017 exclusive : न्यूयॉर्कमध्ये जमली कॅटरिना कैफ आणि आलिया भट्टची गट्टी

सध्या न्यूयॉर्कमध्ये 18व्या आयफा अॅवॉर्डची धूम सुरु आहे. या अॅवॉर्ड सोहळ्यामध्ये रंगत आणण्यासाठी बॉलिवूडमधले स्टार्स न्यूयॉर्कमध्ये दाखल झाले आहेत. याठिकाणी बॉलिवूड मधल्या दोन आघाडीच्या अभिनेत्रींची गट्ट जमली आहे.

IIFA 2017 exclusive : न्यूयॉर्कमध्ये जमली कॅटरिना कैफ आणि आलिया भट्टची गट्टी
Published: 14 Jul 2017 12:16 PM  Updated: 14 Jul 2017 12:16 PM

बॉलिवूडमधल्या दोन अभिनेत्रींमध्ये चांगल्या मैत्रिणी असतील या गोष्टीवर कुणाचाच विश्वास बसणे शक्य नाही. कारण त्यांच्यामध्ये नेहमीच कॅट वॉर पाहायला मिळते. पण न्यूयॉर्कमध्ये बॉलिवूड मधल्या दोन आघाडीच्या अभिनेत्रींची गट्ट जमली आहे ती म्हणजे कॅटरिना कैफ आणि आलिया भट्टची. न्यूयॉर्कमध्ये सध्या 18व्या आयफा अॅवॉर्डची धूम आहे. या अॅवॉर्ड सोहळ्यामध्ये रंगत आणण्यासाठी बॉलिवूडचे स्टार्स न्यूयॉर्कमध्ये दाखल झाले आहेत. यात कॅटरिना कैफ आणि आलिया भट्ट यांचा ही समावेश आहे. नुकत्याच झालेल्या आयफाच्या पत्रकार परिषदेच्या ठिकाणी आलिया भट्ट आणि कॅटरिना कैफ यांनी एकत्र हजेरी लावत अनेकांना आश्चर्याचा धक्का दिला. एवढेच नाही तर या ठिकाणी त्या एकमेकांची स्तुती करताना थकत नव्हत्या. दोघींमधली अनोखी केमिस्ट्री न्ययॉर्कमध्ये पाहायला मिळाली. कॅटरिनाला आयफा 2017मध्ये एक ही नामांकन मिळालेले नाही. तर आलियाला तब्बल 2 चित्रपटांसाठी नामांकन मिळाले आहे. 'उडता पंजाब' आणि 'डिअर जिंगदी'तील अभिनयासाठी आलियाला सर्वोत्तम अभिनेत्रीच्या विभागामध्ये नामांकन मिळाले आहे. हे दोन्ही अॅवॉर्डस आलियालाचे मिळवाते असे कॅटरिना कैफ पत्रकार परिषदेदरम्यान म्हणाली. कारण यातला एक अॅवॉर्ड आलिया मला देणार आहे असेही कॅटरिना पुढे म्हणाली. त्यामुळे हे दोन्ही अॅवॉर्ड तिलाच मिळावेत. न्यूयॉर्कमध्ये दोघी एकमेकींच्या गळ्यात गळे घालून फिरताना दिसतायेत. पत्रकार परिषद संपल्यानंतर ही कॅटरिना आणि आलिया यांनी एका कॉफी शॉपमध्ये जाऊन कॉफी घेतली. त्यांनी फक्त कॉफीच एकत्र घेतली नाही तर ही कॉफी त्यांनी एकाच मगमधून शेअर केली. त्यामुळे न्यूयॉर्कमध्ये सुरु झालेली हे मैत्री आणखीन किती काळ टिकते हे पाहाणे महत्त्वाचे आहे. 


पुन्हा फुलणार का सलमान खान आणि कतरिना कैफची लव्हस्टोरी?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :