​कंगना राणौतने ऑल इंडिया बॅकचोड अर्थात AIB सोबत येऊन बॉलिवूडकरांना चांगलेच सुनावले

​कंगना राणौतने ऑल इंडिया बॅकचोड अर्थात AIB सोबत येऊन बॉलिवूडकरांना चांगलेच सुनावले

​कंगना राणौतने ऑल इंडिया बॅकचोड अर्थात AIB सोबत येऊन बॉलिवूडकरांना चांगलेच सुनावले
Published: 12 Sep 2017 04:41 PM  Updated: 13 Sep 2017 09:39 AM

कंगना राणौतने नुकतीच आप की अदालतमध्ये दिलेली मुलाखत चांगलीच गाजत आहे. सोशल मीडियावर तर ही मुलाखत लोक आवर्जून पाहात आहे. या मुलाखतीवर कंगणा किती बोल्ड आहे हे आपल्याला लगेचच कळून येते. पण आता तिने एक पाऊल पुढे जात सेक्सिझम आणि नेपोटिझमवर भाष्य केले आहे. तिने ऑल इंडिया बॅकचोड अर्थात एआयबी सोबत एक व्हिडिओ केला असून हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच गाजत आहे.

Also Read : कंगना राणौतच्या आप की अदालतमधील मुलाखतीनंतर नेटिझन कंगनाला का मागायला सांगत आहेत क्रिश ३ साठी माफी?

व्हिडिओत एका चित्रपटातील लग्नाचे दृश्य चित्रीत होत असताना दिसत आहे. कंगना या चित्रपटाची नायिका असूनही तिला टॉयलेट पेपरवर स्क्रिप्ट लिहून देण्यात आली आहे. ही स्क्रिप्ट तिला आवडली नसल्याने दिग्दर्शकाशी ती बोलायला जाते तर तू कोण असे तिला तो विचारतो. त्यावर मी नायिका आहे असे ती बोलते तरी दिग्दर्शकाला काही कळत नाही. मी फिमेल लीड आहे असे सांगून सुद्धा त्याला तिची ओळख पटत नाही. त्यावर मी लव्ह इंटरेस्ट आहे असे ती सांगते. त्यावर दिग्दर्शक हा, बरोबर जी नायकासोबत असते ती ना... असे म्हणतो. यातून बॉलिवूडमध्ये नायकाला दिल्या जाणाऱ्या महत्त्वाला अधोरेखित करण्यात आले आहे. 

Also Read : आदित्य पांचोली सांगतोय कंगना राणौत मला पत्नीसारखीच

त्यानंतर व्हिडिओमध्ये कंगनाला गाण्याच्या काही ओळी पटत नसल्याने ती दिग्दर्शकाला काही बदल सुचवते. पण तो त्याकडे लक्ष देत नाही. त्यामुळे ती निघून जाते. तेवढ्यात हिरो मोठाल्या गाडीतून येतो. त्याला पाहाताच दिग्दर्शक त्याची आरती ओवाळतो. त्यात आपल्याला कभी खुशी कभी गममधील जया बच्चन आणि शाहरुख खान यांच्या दृश्यांचा संदर्भ पाहायला मिळतो. (या दृश्यातून काय म्हणायचे आहे, हे सांगायची नक्कीच गरज नाही) यानंतर कंगनाने सुचवलेले बदल नायकाने सुचवल्यावर दिग्दर्शक लगेचच ते बदल करतो आणि त्याने बदल केल्यामुळे तो नायक स्मार्ट असल्याचे दिग्दर्शक त्याला लगेचच बोलतो.
हे सगळे झाल्यावर व्हिडिओतील नायिका एका गाण्यातून आपली मतं व्यक्त करताना दिसते. जॅकलिन फर्नांडिसच्या चिकनी कलाईया या गाण्याच्या संगीतावर एक गाणे ऐकायला मिळते. या गाण्यात नेपोटिझमवर वक्तव्य करण्यात आले आहे. एवढेच नव्हे तर कॉज आय हॅव व्हजायना रे असे कंगना बेधडकपणे बोलताना दिसते. तसेच बॉलिवूडमध्ये नायिका-नायिकांमध्ये असलेल्या वयाच्या अंतरावर देखील भाष्य करण्यात आले आहे. एवढेच नव्हे तर ती सध्या ज्या बेधडक मुलाखती देत आहे, त्याविषयी देखील ती कोणाला घाबरत नसल्याचे तिने यात म्हटले आहे. 
या एकाच व्हिडिओत कंगनाने अनेकांना लक्ष्य केले आहे. तिने नेपोटिझम, सेक्सिजम, नायकाला इंडस्ट्रीत मिळत असलेले महत्त्व अशा अनेक गोष्टींवर सडेतोड भाष्य केले आहे. 
कंगनाने हा व्हिडिओ सिमरन या चित्रपटाच्या पब्लिसिटीसाठी बनवला आहे. कारण सिमरन आवर्जून पाहा असे ती या व्हिडिओच्या शेवटी आपल्याला बोलताना दिसते. 



Also Read : आदित्य पांचोली, हृतिक रोशन, अध्ययन सुमन नव्हे तर या अभिनेत्यासोबतही कंगना राणौतचे होते अफेअर


कंगना राणौतचा सिमरन हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरेल का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :