आता कंगना राणौतने सलमान, शाहरूखवर साधला निशाणा; केले खळबळजनक वक्तव्य!!

हृतिक रोशन, राकेश रोशन, आदित्य पांचोली यांच्यानंतर कंगनाने सलमान खान आणि शाहरूख खानवर निशाणा साधला आहे. तिने खळबळजनक वक्तव्य केल्या इंडस्ट्रीत एकच चर्चा रंगत आहे.

आता कंगना राणौतने सलमान, शाहरूखवर साधला निशाणा; केले खळबळजनक वक्तव्य!!
Published: 14 Sep 2017 03:05 PM  Updated: 14 Sep 2017 03:05 PM

अभिनेत्री कंगना राणौत सध्या तिच्या आगामी ‘सिमरन’ या चित्रपटापेक्षा उलट-सुलट वक्तव्या आणि आरोपांच्या फैरी यामुळेच अधिक लाइमलाइटमध्ये आहे. कंगनाने ‘आप की आदलत’ या शोमध्ये दिलेल्या मुलाखतीत अनेक अभिनेत्यांवर आरोपांची तोफ डागत इंडस्ट्रीत खळबळ उडवून दिली आहे. मात्र आता तिने चक्क बॉलिवूडचा भाईजान सलमान खान आणि किंग शाहरूख खान यांच्याविषयी खळबळजनक वक्तव्य केले आहे. तिने म्हटले की, ‘यांच्याबरोबर काम केले असते तर माझे करिअरच संपले असते.’ 

कंगनाच्या या वक्तव्यामुळे आता बॉलिवूडमध्ये आणखी खळबळ उडण्याची शक्यता आहे. कंगनाने म्हटले की, दिग्दर्शक आदित्य चोपडा त्यांच्या ‘सुलतान’ या चित्रपटात मला सलमान खानसोबत मुख्य भूमिकेत घेणार होते. परंतु मी त्यास स्पष्ट शब्दात नकार दिला.’ याच विषयाच्या अनुषंगाने जेव्हा कंगनाला विचारण्यात आले तेव्हा तिने म्हटले की, मला सलमान, शाहरूखसारख्या स्टार्ससोबत काम न करण्याचे अजिबातच दु:ख होत नाही. उलट मी जर यांच्यासोबत काम केले असते तर माझे करिअरच चौपट झाले असते.’

कंगनाचे हे वक्तव्य खरोखरच खळबळजनक असून, आता यावर पुन्हा एकदा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. या अगोदर कंगनाने हृतिक रोशन, त्याचे वडील राकेश रोशन, आदित्य पांचोली यांच्यावर आरोपांच्या फैरी झाडल्या आहेत. त्याचबरोबर तिने ‘सिमरन’च्या दिग्दर्शकांना खडेबोल सुनावले आहे. कंगनाला तिच्या परखड स्वभावासाठी ओळखले जाते. परंतु यावेळेसचा तिचा अवतार खूपच आक्रमक असल्याने ही चर्चा कुठपर्यंत जाईल हे सांगणे मुश्किलच म्हणावे लागेल. कारण कंगना प्रकरणात दरदिवसाला काहीतरी वेगळीच माहिती समोर येत आहे. 

असो, कंगना कोणाला घाबरणार किंवा कोणाचे तरी ऐकून शांत बसेल असे तूर्तास तरी दिसत नाही. परंतु आता तिने चक्क दबंग सलमान आणि किंग शाहरूख खानसोबत पंगा घेतल्याने हे प्रकरण चिघळण्याची शक्यता आहे. हे दोघे त्यास कशा पद्धतीने उत्तर देतात हे बघणे औत्सुक्याचे ठरेल. 


मराठी बिग बॉस हिट ठरणार का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :