​कमल हासन चालणार का ‘बिग बॉस’च्या मार्गावर?

मोठ्या पडद्यावरचे असेच एक मोठे नाव टेलिव्हिजनच्या जगात डेब्यू करणार आहे. होय, हिंदी व दाक्षिणात्य चित्रपटांचा सुपरस्टार कमल हासन लवकरच छोट्या पडद्यावर दिसणार आहे.

​कमल हासन चालणार का ‘बिग बॉस’च्या मार्गावर?
Published: 18 Apr 2017 12:23 PM  Updated: 18 Apr 2017 12:23 PM

मोठ्या पडद्यावरच्या कलाकारांना आता छोट्या पडद्याचे वावडे राहिले नाही. महानायक अमिताभ बच्चन पासून तर किंगखान शाहरूख खान, आमिर खान, सलमान खान असे सगळेच छोट्या पडद्यावर दिसले. आता मोठ्या पडद्यावरचे असेच एक मोठे नाव टेलिव्हिजनच्या जगात डेब्यू करणार आहे. होय, हिंदी व दाक्षिणात्य चित्रपटांचा सुपरस्टार कमल हासन लवकरच छोट्या पडद्यावर दिसणार आहे. विशेष म्हणजे छोट्या पडद्यावर कमल सलमान खानच्या वाटेने जाताना दिसणार आहेत.
एका खासगी वाहिनीने ‘बिग बॉस’चे तामिळ व्हर्जन होस्ट करण्यासाठी कमल हासनशी संपर्क साधला आहे. अर्थात अद्याप कमलने या वृत्ताला अधिकृत दुजोरा दिलेला नाही. पण कमलने हा प्रस्ताव स्वीकारलाच तर त्याच्यातील होस्ट प्रेक्षकांना पाहता येणार आहे. कमलच्या चाहत्यांसाठी निश्चितपणे ही आनंदाची गोष्ट ठरणार आहे. ‘बिग बॉस’च्या या तामिळ व्हर्जनमध्ये सामील होणारे स्पर्धकही तामिळ इंडस्ट्रीतीलच असतील. ‘बिग बॉस’चे हिंदी व कन्नड व्हर्जन प्रचंड गाजले.  आता हा शो तामिळ भाषेत आणण्याचे प्रयत्न सुरु झाले आहेत.

ALSO READ : कमल हासनच्या आयुष्यातील महिला...!

कमल हसन आपल्या वादग्रस्त वक्तव्यांनी कायम चर्चेत असतो. अलीकडे महाभारतावर वादग्रस्त टीप्पणी करून कमलने वाद ओढवून घेतला होता. ‘महाभारतात पुरुष जुगार खेळत असताना द्रौपदीचा एक प्यादा म्हणून वापर केला गेला. तिला दुय्यम स्थान दिले गेले. ज्या महाभारतात, जुगारासाठी महिलेचा एक प्यादा म्हणून वापर झाला, त्या महाभारताला हा देश मान देतो,’असे वक्तव्य कमलने केले होते. याप्रकरणी कमलविरोधात याचिका दाखल करण्यात आली आहे. अगदी काही दिवसांपूर्वी कमलच्या घराला आग लागली होती. या आगीतून कमल थोडक्यात बचावला होता.


पब्लिसिटीसाठी इशा गुप्ता करतेय का बोल्ड फोटोशूट?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :