इन्स्टाग्रामवरुन आलिया भट्टला अनफॉलो करण्याच्या प्रकरणावर अखेर बोलली जॅकलिन फर्नांडिस

आलिया भट्ट आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांचे ब्रेकअप गेल्या अनेक दिवपांपासून वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आहे. दोघांमध्ये आलेल्या दुराव्याचे कारण जॅकलिन फर्नांडिस असल्याचे सांगितले जाते आहे

इन्स्टाग्रामवरुन आलिया भट्टला अनफॉलो करण्याच्या प्रकरणावर अखेर बोलली जॅकलिन फर्नांडिस
Published: 11 Sep 2017 03:45 PM  Updated: 11 Sep 2017 05:21 PM

आलिया भट्ट आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांचे ब्रेकअप गेल्या अनेक दिवपांपासून वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आहे. दोघांमध्ये आलेल्या दुराव्याचे कारण जॅकलिन फर्नांडिस असल्याचे सांगितले जाते आहे. काही दिवसांपूर्वी रिलीज झालेल्या 'ए जेंटलमॅन' चित्रपटात दोघे एकत्र दिसले होते. याचित्रपटाच्या शूटिंग दरम्यान दोघांमधील जवळीकता वाढली होती. आधी सगळ्यांनी या गोष्टीला फारसे सीरिसली घेतले नाही. कारण एखादा चित्रपट रिलीज होण्यापूर्वी चर्चेत राहण्यासाठी अभिनेता आणि अभिनेत्री अफेयर असल्याच्या बातम्या सरस पेरल्या जातात. मात्र सिद्धार्थ आणि आलियाचे ब्रेकअप झाल्यानंतर सगळ्यांनी या गोष्टीला गंभीरतेने घेतले ऐवढेच नाही तर यानंतर जॅकलिनने आलिया इन्स्टाग्रामवरून अनफॉलोदेखील केले. 

मिड-डे मध्ये आलेल्या रिपोर्टनुसार आलिया आणि जॅकलिन या दोघांच्या कानापर्यंत जेव्हा ही गोष्ट पोहोचली तेव्हा त्या हसल्या होत्या.  दोघी एकमेंकीना ट्वीटरवर फॉलो करतात मात्र आपण आलियाला इन्स्टाग्रामवर फॉलो करत नसल्याचे जॅकलिन म्हणाली. सूत्रांच्या माहितीनुसार आलिया आणि जॅकलिनचे एकमेंकीसोबत चांगले नाते आहे. दोघी ऐकमेकींना भेटतात तेव्हा खूप गप्पा मारतात. मग जॅकलिनने आलिया अनफ्लोल केल्याची बातमी आली कुठून हा प्रश्न आता सगळ्यांना पडला आहे. 

ALSO READ :  ​जॅकलिन फर्नांडिसने आलिया भट्टला का केले अनफॉलो?

29 सप्टेंबरला जॅकलिनचा 'जुडवा 2' रसिकांच्या भेटीला येतो आहे. यात जॅकलिनसह वरुण धवन आणि तापसी पन्नू यांच्या ही महत्त्वाच्या भूमिका आहेत. तर आलिया तिचा आगामी चित्रपट राजीच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. मेघाना गुलजार दिग्दर्शित हा चित्रपट पुढच्या वर्षी मे महिन्यात चित्रपटगृहात रिलीज होणार आहे. यात आलिया एक कश्मीर मुलीची भूमिका साकरते आहे. आलियाच्या अपोझित यात विकी कौशल झळकणार आहे. 


गोलमाल अगेन या वर्षातील सगळ्या चित्रपटांचे रेकॉर्ड मोडणार का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :