IIFA 2017:Exclusive: सातासमुद्रापार वरूण धवणचा बोलबाला

चाहत्यांचे सातासमुद्रापार मिळणारे हे प्रेम पाहून त्याचाही आनंद व्दिगुणित झाल्याचे पाहायला मिळाले.

IIFA 2017:Exclusive: सातासमुद्रापार वरूण धवणचा बोलबाला
Published: 14 Jul 2017 10:31 AM  Updated: 14 Jul 2017 10:47 AM

यंदा न्युयॉर्कमध्ये 18व्या आयफा पुरस्कार सोहळ्याची धुम पाहायला मिळतेय.यंदाच्या 18व्या आयफा पुरस्कार सोहळ्यात 'जुडवा 2' या सिनेमाचाच बोलबाला पाहायला मिळणार आहे. 'आयफा' पुरस्कार सोहळा म्हटल्यावर बॉलिवूडकरही आपल्या स्टायलिश अंदाजात या सोहळ्यात पोहचले आहेत.यंदाचा हा आयफा पुरस्कार सोहळा इतर सेलिब्रेटींप्रमाणे वरूण धवनसाठीही थोडा खास असणार आहे.कारण या पुरस्कार सोहळ्यात वरूण धवनचा बोलबाला पाहायला मिळणार आहे.या सोहळ्यात वरूण धवनच मुख्य आकर्षण ठरतोय.या सोहळ्यात रसिकांची मनं जिंकण्यासाठी वरूणनंही जय्यत तयारी केली आहे.विशेष म्हणजे वरूण धवनला 'ढिश्शुम' या सिनेमासाठी बेस्ट सपोर्टींग कॉमिक रोलसाठी नॉमिनेट करण्यात आले आहे.तसेच त्याचा आगामी 'जुडवा 2' हा सिनेमाही सध्या खूप चर्चेत आहे. त्यामुळेच सिनेमात खास आकर्षण असलेले ''उँची है बिल्डींग लिफ्ट तेरी बंद है'' या नव्या व्हर्जनमधल्या गाण्याची झलक सोहळ्यात पाहायला मिळणार आहे.तसेच ''टन टना टन टनटनटारा चलती है ये क्या नौ से बारा'' गाण्यावर वरूण धवन तापसी पन्नुसह थिरकणार आहे.आयफा पुरस्कार सोहळा म्हटला तर बीटाऊन सेलेब्सच्या धमाकेदार परफॉर्मन्स पाहण्यासाठी सगळेच उत्सुक असतात.मात्र या सगळ्यांमध्ये वरूण धवनच्या परफॉर्मन्सची जास्त उत्सुकता पाहायला मिळत आहे. कारण सलमानवर चित्रीत झालेले 'जुडवा' या सिनेमातील गाणं पूर्वी तुफान हिट ठरले होते.त्यामुळे तो पहिल्यांदाच सलमान खान समोर या गाण्यावर परफॉर्म करणार आहे.वरूणचे चाहते तसे जगभरात आहेत.हॉटेलमध्ये वरूणला पाहताच चाहत्यांनी त्याला भेटुन आपला आनंद व्यक्त केला.वरूणसह एक स्विट सेल्फी क्लिक करत त्याचा आटोग्राफही घेत असल्याचे पाहायला मिळाले. वरूण धवनही त्याच्या चाहत्यांना पाहून खुश झाला होता.चाहत्यांचे सातासमुद्रापार मिळणार हे प्रेम पाहून त्याचाही आनंद व्दिगुणित झाल्याचे पाहायला मिळाले. 


कंगना राणौतचा सिमरन हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरेल का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :