​ऐश्वर्याच्या हॉट अन् ब्युटीफुल अंदाज

वय वाढत असतानाच ऐश्वर्याचे सौंदर्य दिवसेंदिवस वाढत चालले आहे असेच म्हणावे लागेल. ऐश्वर्या आपल्या अंदाजाने आणि सौंदर्याने प्रत्येकाला वेड लावू शकते यात शंकाच नाही.

​ऐश्वर्याच्या हॉट अन् ब्युटीफुल अंदाज
Published: 27 Jan 2017 09:00 PM  Updated: 27 Jan 2017 09:00 PM

बॉलिवूड सुंदरी ऐश्वर्या राय बच्चन हिच्या सौंदर्याची तुलना करणे अशक्य आहे. ऐश्वर्या राय बच्चन जेवढी सुंदर आहे तेवढाच तिचा स्टाईल स्टेटमेंटही जबरदस्त आहे. अशातच ऐश्वर्या पुन्हा एकदा हॉट फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे. तिचा हा फोटोशूट सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. 

करण जोहर दिग्दर्शित ‘ऐ दिल है मुश्किल’ या चित्रपटात ऐश्वर्या हॉट व बिनधास्त अंदाजात दिसली होती. तिचा हा लूक तिच्या चाहत्यांना चांगलाच आवडला होता. रणबीर कपूरसोबत दिलेले हॉट व इंटिमेट सिन्सनंतर पुन्हा एकदा आपला हॉट अंदाज ऐश्वर्या दाखवू पाहत आहे. नुकतेच ऐश्वर्याने एक जबरदस्त फोटोशूट केला आहे. या फोटोंमध्ये तिच्या सौंदर्याची जादू मनाला मोहणारी ठरत आहे. या फोटो पाहून कुणीही तिच्या प्रेमात पडेल असे हे फोटो आहेत. ऐश्वर्याने फे मिना मॅगझिनच्या फरवरी इश्यूसाठी हे फोटोशूट केले आहे. यात ती कव्हरपेजवर झळकणार आहे. 

 


ध्रु्रव कपूर याने डिझाईन केलेल्या ड्रेसमधील ऐश्वर्याचे फोटोपाहून तिच्या सौंदर्याचे बखान करणे कठीण असले तरी तिने केलेला आय मेकअप नजर हटू देत नाही. ब्लॅक ड्रेसमध्ये ती अतिशय सुंदर दिसत आहे. मेकअप आर्टिस्ट आस्था शर्मा हिने तिचा मेकअप केला आहे. या शिवाय तिचे फोटो आकर्षित करणार आहे. तिचा अंदाज मनमोहक ठरला आहे. 

वय वाढत असतानाच ऐश्वर्याचे सौंदर्य दिवसेंदिवस वाढत चालले आहे असेच म्हणावे लागेल. ऐश्वर्या आपल्या अंदाजाने आणि सौंदर्याने प्रत्येकाला वेड लावू शकते यात शंकाच नाही. हा नवीन फोटोशूट याचाच दाखला देत आहेत असेच म्हणावे लागेल. आई झाल्यावरही तिचे सौंदर्य कायम असून नवख्या अभिनेत्री देखील ऐश्वर्यासमोर फिक्या दिसू लागल्या आहेत. 


 
 

Femina India #AishwaryaRaiBachchan #aishwaryarai #aish

A photo posted by


कंगना राणौतचा सिमरन हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरेल का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :