Funny Video : ‘बाप की अदालत’मध्ये हृतिक रोशनने दिले कंगना राणौतच्या आरोपांना उत्तर!

कंगना आणि हृतिकच्या वादावर आधारित एक फनी व्हिडीओ यू-ट्यूबवर चांगलाच पसंत केला जात आहे. या व्हिडीओला मोठ्या प्रमाणात बघितले जात आहे.

Funny Video : ‘बाप की अदालत’मध्ये हृतिक रोशनने दिले कंगना राणौतच्या आरोपांना उत्तर!
Published: 14 Sep 2017 04:26 PM  Updated: 14 Sep 2017 04:26 PM

सध्या मायानगरीत सर्वाधिक चर्चेत कोण असेल तर ती अभिनेत्री कंगना राणौत आहे. होय कंगनाने इंडिया टीव्हीवरील ‘आप की अदालत’ या शोमध्ये एक मुलाखत देऊन इंडस्ट्रीत खळबळ निर्माण केली. या मुलाखतीत कंगनाने ज्या शैलीत तिचे आणि हृतिक रोशनच्या नात्यावर भाष्य केले त्यावरून हे प्रकरण किती गंभीर आहे, याविषयी चर्चा रंगू लागली. कंगनाने एकापाठोपाठ एक पत्ते उघड करताना हृतिकच्या स्टारडमवरच घणाघात केला. आता कंगनाच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी हृतिक मैदानात उतरला आहे. मात्र त्यासाठी तो ‘आप की अदालत’मध्ये नव्हे तर ‘बाप की अदालत’मध्ये सहभागी झाला आहे. यू-ट्यूब चॅनेल दी स्क्रीन पत्तीद्वारा या व्हिडीओमध्ये कंगना आणि हृतिक प्रकरणाचा मजेशीर अंदाजात पर्दाफाश करण्यात आला आहे. अर्थातच हा एक फनी व्हिडीओ असून, यू-ट्यूबवर प्रचंड प्रमाणात बघितला जात आहे. 

व्हिडीओमध्ये हृतिक मास्क घालून पोहोचला असून, प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देताना दिसत आहे. आश्चर्याची बाब म्हणजे या शोमध्ये जज म्हणून चक्क धूपवाला ‘जादू’ बघावयास मिळत आहे. पहिल्याच आरोपाचे उत्तर देताना हृतिक सांगतो की, अखेर मी माझ्या वडिलांचे पैसे घेऊन का ‘बॅँग बॅँग’ करीत फिरतो. वडिलांचे पैसे खर्च करून माझे वडील हेअरलेस झाल्याचेही तो म्हणतो. यानंतर हृतिक म्हणतो की, ‘कंगनाला मी हजारापेक्षा अधिक मेल केले. परंतु हे मेल मी स्वत:हून पाठविले नाही. त्याचे झाले असे की, रात्री झोपल्यानंतर फोन माझ्या शरीराखाली दबला गेला. कोणास ठाऊक कोणते बटण दबले गेले अन् कंगनाला सर्व मेल फॉरवर्ड झाले. 



त्यानंतर हृतिकवर आरोप करण्यात आला की, कंगनाच्या पार्टीत तू झोपून का नाचत होता. त्यावर उत्तर देताना हृतिक म्हणतोय की, मी नाचत नव्हतो तर माझ्या पाठीला आग लागली होती. ती विझविण्यासाठी मी जमिनीवर झोपून आग विझविण्याचा प्रयत्न करीत होतो. नेमकं त्याचवेळी कोणीतरी म्युझिक आॅन केले आणि लोकांना वाटले की, मी डान्स करीत होतो. आता ही बातमी वाचल्यानंतर एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल की, हा सर्व फनी व्हिडीओचा चमत्कार आहे. व्हिडीओमध्ये दिसत असलेली व्यक्ती हृतिकच्या क्रिस अंदाजात आहे. त्याचबरोबर जादू जज म्हणून दिसत आहे. हा फनी व्हिडीओ सध्या चांगलाच पसंत केला जात आहे. 

असो, गेल्या काही दिवसांपासून कंगना आणि हृतिक यांच्यातील वाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे. हृतिक व्यतिरिक्त अध्ययन सुमन आणि आदित्य पांचोलीबरोबरचे कंगनाचे नातेही चर्चेत आले आहे. काही दिवसांपूर्वीच ट्विटरवर कंगनाची बहीण रंगोली आणि आदित्य पांचोलीची पत्नी जरीना वहाब यांच्यात खडाजंगी रंगली होती. आता हा वाद किती विकोपाला जाईल हे बघणे औत्सुक्याचे ठरेल. 


गोलमाल अगेन या वर्षातील सगळ्या चित्रपटांचे रेकॉर्ड मोडणार का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :